अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं- 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर -10 ऑगस्ट:- मानवी जिवनाला काळीमा फासणाऱ्या मणिपुर येथील महिलांची नग्न धिंड काढुन सामुहिकरित्या बलालत्काराच्या घटनेच्या निषेधार्थ सावनेर तालुक्यातील सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी जनकल्याण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष भगवान चांदेकर, बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशबाबू डोंगरे तसेच संभाची ब्रिगेड चे विदर्भ प्रमुख दिनेश ईंगोले यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
सावनेर बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून मोर्च्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी बस स्थानक ते गांधी चौक तर धापेवाडा चौक असा नगरभ्रमन करून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी व नारेबाजी करित शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
याप्रसंगी सावनेर येथील तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटल आहे की, मणिपुर मधील स्ञियांची नग्न धिंड काढुन सामुहिकरित्या बलत्कार करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यां कडुन करण्यात आली. तसेच मणिपुर मध्ये राष्ट्रपती शासन लागु करावे. संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविरुद्ध अभद्र वक्तव्य केल्यामुळे यांना तात्काळ अटक करावी. मध्यप्रदेश येथे एका आदिवासी मुलावर पेशाब करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. ओबीसी ची जातीय जनगणना त्वरित करावी आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भगवान चांदेकर, सुरेशबाबू डोंगरे, दिनेश ईंगोले,
बलराम चोरे, सचिन लिडर, शांताराम ढोके, सुभाष मछले, पंकज गायकवाड, गणपती पठाणे, पवन नइमकर, राकेश घाटी, ऊत्तम रागासे, शकील झेडीया, विक्रम गमे, स्नेहल सय्यम, चरणदास बारमासे, प्रशांत ठाकरे, राकेश पाटील, सुधाकर तीबोले, नीलीमा बाळापुरे, मनोज राऊत, हर्षल राऊत, सचिन पराये, रत्नमाला रागासे, विक्रम गमे, मुन्नीबाई रामटेके, राजु खांडे, मयूर नागदवणे, अनुप पठाणे, दादाराव लांजेवार, सुजित मेश्राम, आदिसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

