मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शिवशक्ती पुरातन गणेशोत्सव मंडळ हनुमान – नन्नाशाह वॉर्ड येथे करण्यात आले होते. रक्त तपासणी शिबिरा मध्ये शुगर टेस्ट, ब्लड प्रेशर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणीचे असे विविध तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
हिंगणघाट शहरातील हनुमान – नन्नाशाह वॉर्ड येथील हजारो नागरिकांनी तपासणी शिबिरामध्ये तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता आपला प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे प्रभागातील लोकांनी आभार मानले. रक्त तपासणी शिबिरामध्ये स्वामी क्लिनिकल लॉबोरेटरी/युवा परिवर्तन नरसिंग ग्रुप प्रफुल्ल तडस, रूतूजा अवचट (तडस), प्रतिभा कातोरे, दिप्ती अवचट, आदेश चौधरी, सचिन तोंडरे आदीनी सेवा देऊन सहकार्य केले. या शिबिराचे आयोजक कमेटी शिवशक्ती पुरातन गणेशोत्सव मंडळ, हनुमान/नन्नाशाह/खंडोबा वार्ड यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

