हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील वरोरा येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन गरीब कुटुंबातील मुलीला जेवण, निवास व पैशाचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायात ओढून तिच्याकडून देहव्यापार करवून घेण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
एका गरीब कुटुंबातील मुलीला आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेण्यात आलेल्या प्रकरणात वरोरा पोलिसांनी 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहे. त्यात मुलीची अश्लील चित्रफित तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्या प्रकरणी रमेश मेश्राम, महेश जीवतोडे व राकेश शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणात आणखी बरीच नावे समोर येण्याची शक्यता आहे.
वरोरा परिसरात वेश्या व्यवसाय करणारी टोळी मागील अनेक दिवसापासून सक्रिय होती. त्यात या अल्पवयीन मुलीकडून मागील दाेन ते तीन महिन्यांपासून देहव्यापार करवून घेतला जात होता. यावेळी चंद्रपूर जिल्हातील वरोरा, भद्रावती सह अनेक भागातील ग्राहकाकडून 500 रुपये घेवून अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय महिलेसह ग्राहकांना अटक केली आहे.
वेश्याव्यवसाय प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता, यादरम्यान दोन दलाल आणि ग्राहकांनी अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू झालेला हा प्रकार फोन डिटेल्सवरून उघड झाला आहे. या वेश्याव्यवसाय प्रकरणात आणखी 5 ते 10 आरोपी सामील असण्याची शक्यता आहे. न्यायालयीन पंचनामा केल्यानंतर आरोपींची ओळख पटणार आहे. अल्पवयीन लैंगिक कायदा, वेश्याव्यवसाय कायद्याच्या कलम 226/23 पॉस्को, पिटाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाात आणखी ग्राहक वेश्याव्यवसायात गुंतले आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी एसआयटी समिती स्थापन केली आहे.
या समितीमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा आयुष नोपानी, पोलीस स्टेशनचे अमोल कचोरे, दोन महिला पोलीस अधिकारी, सायबर रायटर अशी एकूण आठजणांची एसआयटी समिती स्थापन केली आहे. दरम्यान अश्लील चित्रफित सार्वत्रिक केल्यानंतर आता आणखी बरीच नावे या प्रकरणात समोर येत आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.

