✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 11:- देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, लोकप्रतिनिधींनी एकाचवेळी उपस्थिती दर्शवून पंचप्रण शपथ घेतली.
या पंचप्रण शपथ कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील 521 ग्रामपंचायत, तालुक्यातील सर्व पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय, नगर पालिका व नगर पंचायती, जिल्हास्तरीय सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, जिल्ह्यातील 1 हजार 479 शाळा व महाविद्यालयातील 2 लाख 9 हजार 889 विद्यार्थ्यांसह लोकप्रतिधी, ग्रामस्थ तसेच बचतगटाच्या महिलांनी गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शपथ कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून हातात माती व मातीचे दिवे प्रज्वलीत करुन पंचप्रण शपथ घेतली.
या शपथ कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबाबत सर्वांचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे व कार्यक्रमाच्या नेाडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे यांनी अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

