प्रशांत जगताप
हिंगणघाट:- आज हिंगणघाट शहरात एक मानाचा तुरा रोवला गेला. तुळसकर हॉस्पीटल मध्ये जटील प्लास्टिक सर्जरी संपन्न. एका २२ वर्षीय मुलीला मागील ५-६ वर्षापासून कमरेच्या भागात रक्तवाहीनीचा गोळा A-V (मालफार्मेशन) या आजाराने पिडीत होती. मागील ५ ते ६ वर्षामध्ये हा गोळा झाला होता. त्याचे त्वचेवर भेगा पडणे सुरू झाले होते. त्यामुळे गोळा कधीही फुटुन अति रक्तश्त्रावामुळे रुग्णाच्या जिवाला धोका होवू शकला असता या कारणामुळे रुग्णाच्या आईने व नातेवाईकांने तिला वर्धा व यवतमाळ येथील अनेक दवाखान्यात उपचारासाठी दाखविले होते
रुग्णाच्या रोगाची उपचाराची जटीलता लक्षात घेता तिला नागपूरला जाण्याच्या सल्ला दिला परंतु रुग्णाची आर्थिक परिस्थीती जेमतेम असून गरीबीची असल्यामुळे नागपूरचा खर्च झेपत नसल्यामुळे नागपूरला जाणे शक्य नव्हते अशा परिस्थीतील पेशंटला हिंगणघाटचे जनरल सर्जन डॉ. निलेश तुळसकर यांना दाखविण्यात आले. डॉ. निलेश तुळसकर यांनी आजाराची गंभीरता व जटीलता लक्षात घेता रुग्णाला हिंगणघाट येथे नियमित प्लास्टिक सर्जरी सेवा देणारे हिंगणघाट येथील प्रसिध्द प्लास्टिक सर्जन डॉ. चैतन्य अशोक रामटेके यांचे कडे पाठविले. रुग्णच्या नातेवाईकांनी हिंगणघाट येथील हातेकर हॉस्पिटल स्थीत त्यांचे प्लास्टिक सर्जरी क्लिनिक मध्ये डॉ. रामटेके यांची भेट घेतली आणि आपण हे हिंगणघाट शहरात करू शकतो अशा विश्वास रुग्णाच्या नातेवाईकांनी दिला.
प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. चैतन्य रामटेके यांनी नागपूर येथील रेडीओलॉजिस्ट डॉ. आकाश रामटेके यांचे मदतीने कमीत कमी खर्चा मध्ये कॉन्ट्रास, एम आर आय व सिटी एन्जोग्राफी करून घेतली व शस्त्रक्रियेसाठी तुळसकर हॉस्पीटल मध्ये भरती करण्यात आले.
त्यानंतर या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. चार तास चाललेल्या या गुंता गुंतीच्या शस्त्रक्रिये नंतर रक्तवाहीनीचा गोळा काढण्यात डॉ. चैतन्य रामटेके यांना यश आले. या ऑपरेशन साठी डॉ. रामटेके यांना डॉ. निलेश तुळसकर व बधीरीकरण तज्ञ डॉ. प्रफुल सातभाई व सिस्टर सोनु सातघरे यांनी विशेष सहकार्य केले.
पेशंटनी पुर्ण पणे बरे झाल्यानंतर प्लॉस्टीक सर्जन डॉ. चैतन्य रामटेके, डॉ. निलेश तुळसकर, डॉ. प्रफुल सातभाई व हॉस्पीटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले तसेच रुग्णाला लागणारे रक्त संकलन करण्यास मदत करणारे सायंकार पॅथालॉजी लॅबचे श्री. संदीप सायंकार यांचे विशेष आभार मानले.