🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी🖊️
हिंगणघाट:- येथून एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. हिंगणघाट नगर पालिका प्रशासनाद्वारा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम मागील दोन दिवसा पासून सुरू केलेली आहे. त्यात रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढून रस्त्या मोकळा करण्याचे काम करत असलेल्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यावर काही लोकांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील 2 दिवसापासुन शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. काल दि. 30 ऑगस्टला नदोरी चौक परिसरात असलेले अतिक्रमण पाडण्यासाठी गेले असता अधिकृत बांधकाम अधिकारी सुनिल घोडमारे, शेख रफीक, मदन माशणकर, अविनाश चौहान यांचवर रोडवरील अवैध अतिक्रमण मधील दुकानदारांनी नगर पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यावर टिकास पावड्यानी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती खुद नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र संदेश न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नदोरी चौक परिसरात असलेल्या अधिकृत अतिक्रमण असल्यामुळे सामान्य जनतेला जाण्या येनाला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने हिंगणघाट नगर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याकरिता गेले असताना भाजीपाला विकणारा पोलिस कर्मचारी समोर नगर पालिका कर्मचाऱ्यांना भाजीपाला विक्रेत्यांनी मारण्याच्या प्रयत्न केलाला आहे.
पालिकेच्या अतिक्रमण कारवाईवर प्रश्न चिन्ह.
सध्या शहरात सर्विकडे गणपतीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असून बाजारात मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून येत आहे. अशा कमावत्या वेळी अशी अतिक्रमण कारवाई करण योग्य नाही अशी भूमिका भाजी विक्रतेच्याची होती. त्यामुळे हिंगणघाट नगर पालिका प्रशासनाच्या या अतिक्रमण कारवाई वर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

