पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दि.11/08/2023 रोजी पोलीस निरीक्षक सुनील थोपटे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे स्टाफसह पुणे पोलीस आयुक्तांच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन जगदाळे व योगेश मांढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम बिबवेवाडी कडे जाणाऱ्या सर्विस रोडवर सॅमसंग दुकानासमोर सार्वजनिक रोडवर मॅफेड्रोन (एम.डी.) हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक सुनील थोपटे व अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे दिनेश मनोहर काळे वय 24 वर्षे राहणार जाधव वस्ती मुक्काम पोस्ट जवखेड जिल्हा अहमदनगर सध्या राहणार पार्किंग क्रमांक दोन संगमवाडी पुणे याच्या ताब्यात एकूण 7,27,000/- रुपये किमतीचा 36 ग्रॅम 350 मिली ग्रॅम एम.डी. असं अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.—-/२०२३ एन.डी.पी.एस. अक्ट कलम 8(क),22(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करत आहे.
सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री. अमोल झेंडे, सो मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक, एस डी नरके, पोलीस अमलदार नितीन जगदाळे, योगेश मांढरे चेतन गायकवाड, महेश साळुंखे, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संदीप जाधव यांनी केली आहे.
सुनिल थोपटे, पोलीस निरीक्षक,

