पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- कोयता घेऊन पुण्यात दहशत माजविणा-या तरुणांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाठलाग करुन चोप देणा-या पोलीस धनंजय पाटील व अक्षय इंगवले यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली. कार्यक्रमाला कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

