मुकेश शेंडे, तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
सिंदेवाही :- तालुक्यात गडमौशी लघुपाटबंधारे विभागाच्या तलावाचे पाणी व्यवस्थापन व कालवे देखरेखीचे कार्य शेतकरी पाणी वापर संस्था गडमौशी मायनर सिंदेवाहीकडे हस्तांतरीत केलेले आहे . ह्या वर्षी सन २०२२-२३ चे खरीप हंगामाकरीता तलावाचे पाण्याची पातळी १५ आँगस्ट २०२२ रोजी पुर्णतः १००% झाली गेल्या ८-१० दिवसापासून पावसाने दडी मारली असुन भात पीकाला पाण्याची गरज लक्षात घेता दिनांक २९/८/२०२२ रोजी तलाव सुरु करण्यात आला असून गडमौशी तलावाचे नियमीत पाणीकर भरणा करणार्या लाभार्थी शेतकर्यांनी चालु खरीप हंगामातील आँगस्ट, सप्तेंबर व आक्टोंबर महीन्यात पाणी कराचा भरणा केल्यास संस्थेकडून पाणी करात ५०% विशेष सुट देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
तसेच शेतकर्यांनी आप-आपल्या पाटचार्या साफ करुन आप- आपसात वादवीवाद न करता टेल- टू- हेड या पद्धतीने पाण्याचा वापर करुन पाण्याचा अपव्यय टाळावा व संस्थेस सहकार्य करावे असे आव्हान संस्थेच्या संचालक मंडळाकडून करण्यात येत आहे. ह्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा.