पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. १९/०६/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचा टैम्पो राहते घराचे बाहेर सार्वजनीक रोडवर पार्क करुन घरी जावुन रात्री जेवण करुन झोपले असताना दि. २०/०६/२०१३ रोजी फिर्यादींचे घराचे बाहेर मोठ-मोठयाने आवाज ऐकु आल्याने फिर्यादी हे बाहेर येवून पाहता सात ते आत अनोळखी इसम वसाहतीचे बाहेर रोडवर पार्क केलेल्या गाडयांच्या काचा त्यांचे हातातील लोखंडी हत्यार व दगडाने फोडताना दिसले. त्यावेळी गाडया फोडणा-या इसमांना विचारता त्यातील एका इसमाने त्यांचे हातातील लोखंडी हत्यार फिर्यादीना दाखवुन जवळ याल तर याद राखा पुढे येणाराला संपवुन टाकु असे म्हणुन त्यांच्या हातातील हत्याराने दहशत निर्माण करून तेथे रस्त्यावर पार्क केलेल्या एकुण २६ गाड्यांच्या काचा फोडुन नुकसान केल्याने फिर्यादींना दिसले त्याबाबत फिर्यादी यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३८ / २०२३ भारतीय दंड संहिता कलम के १४३, १४४ १४७, १४८, १४९,४२७,५०६ (२) ऑर्म अॅक्ट ४ (२५) म.मो अधि क ३७ (१) (३) सह १३५ क्रि लॉ अगे क ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्ह्याचा तपासा करीता आरोपी नामे १) दिग्विजय ऊर्फ पपुल्या तुकाराम वाघमारे वय २० वर्षे, रा. बराटे चाळ, दत्तनगर, रामनगर, वारजे, पुणे ( टोळी प्रमुख) २) कमल चक्रबहादुर साह वय १९ वर्षे रा. गल्ली नं.२. चव्हाण नगर धनकवडी, पुणे ३) भगवान धाकलू खरात, वय २० वर्षे, रा. लेन नं. १०, श्रमिक वसाहत, कर्वेनगर, पुणे ४) लिग्गाप्पा ऊर्फ नितीन सुरेश गडदे वय २० वर्षे, रा. वडारवस्ती, कर्वेनगर, पुणे ५) देविदास बसवराज कोळी वय १९ वर्षे, रा. घर नं.३८, लेन नं. ०३. कॅनल रोड, कर्वेनगर, पुणे यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन दोन (०२) विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले आहे. दाखल गुन्यात अजुन तीन (०३) पाहिजे आरोपी फरार आहेत.
दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये सदर टोळीवर एकुण ०२ गुन्हे एकत्र केल्याची नोंद असुन, स्वंतंत्र पणे एकुण १२ गुन्हे असे एकुण १४ गुन्हे केल्याची नोंद आढळुन आली आहे. तसेच दिग्विजय ऊर्फ पपुल्या तुकाराम वाघमारे (टोळी प्रमुख) याने नव्याने आपली टोळी तयार केली असुन टोळी वाढवित असल्याने तसेच गुन्हे घडवून आणणे करीता विधी संघर्षीत बालकांचा वापर करत असून टोळी वाढविण्यासाठी टोळी सदस्य गुन्ना नदाफ तसेच लिग्गाप्पा ऊर्फ नितीन सुरेश गडदे, हे त्यास मदत करत आहेत. त्याचेवर व त्याचे इतर साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून सहकारनगर परीसरात त्याने दहशत निर्माण केली आहे. त्याने आपली संघटीत गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली आहेत. विधी संघर्षीत बालक यांना दारूचे व्यसन लावणे तसेच त्यांना पैशाचे आमिष दाखवुन गुन्हे घडवून आणणे, आपले टोळीचे वर्चस्व वाढावे तसेच जनमानसात दहशत राहावी हाच उद्देश ठेवून गुन्हे केलेले आहेत.
आरोपी आपल्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii)३ (२) ३ (४) प्रमाणेचा अंर्तभाव करणे कामी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाले यांनी मा. पोलीस उप-आयुक्त, परि-०२, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून सहकारनगर पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. १३८ / २०२३ भारतीय दंड: संहिता कलम क १४३, १४४, १४७, १४८, १४९, ४२७,५०६ (२) ऑर्म अॅक्ट ४ (२५) म.पो. अधि क ३७ (१) (३) सह १३५ क्रि. लॉ. अमे क ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( ४ ) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक
विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील यांनी पुर्वमान्यता दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहा पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगावकर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि-०२, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र गाळाळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री संदिप देशमाने, सव्हेलन्स पथकाकडील, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, मंगेश खेडकर, पुजा तिडके, भाऊसाहेब आहेर यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त्तपुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ४६ वी कारवाई आहे.

