मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- येथील निराधार महिला श्रीमती सुलताना इर्शाद खान पठाण यांची घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे घरी मुलीचे लग्न करावयाचे असल्याने त्या आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर क्षणाचा विचार न करता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मुलीच्या लग्नसमारंभासाठी आर्थिक मदत केले, पुढील लग्नाच्या वाढचालीस शुभेच्छा दिल्या. माझी आमदार दीपक दादा आत्राम यांच्या आभार व्यक्त केले.
या वेळी नर्गिस पठाण, अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने, आविस पदाधिकारी योगेश दुर्गे, प्रकाश मेश्राम, तिरुपती झाडे, तौफिक पठाण, जुलेख शेख, विनोद कावेरी आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348