अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, दि.13 ऑगस्ट:- नागपूर येथील हिंदू मुस्लिम एकतेचे असलेले प्रसिद्ध ताजबाग येथील बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 101 व्या वार्षिक उर्स निमित्त श्री. क्षेत्र वाकी दरबार ट्रस्ट तर 13 ऑगस्टला शाही संदल काढण्यात आला.
हा शाही संदल श्री. क्षेत्र वाकी दरबार येथून निघून छोटा ताजबाग (सक्करदरा) येथे 1 वा. पोहचला. यावेळी तेथे कव्वाली महाप्रसाद होऊन तेथून शाही संदल 3 वाजता निघून ताजबाग शरीफ येथे पोहचला. यावेळी बाबा ताजुद्दीन औलिया यांना भक्ती भावाने चादर, फुल, अत्तर चढवून सर्व भक्तांच्या सुख समृद्धीची प्रार्थना करण्यात आली.
या संदल मध्ये सर्व स्वयंसेवक सहित हजारो भाविक उपस्थित होते. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तसेच सज्जादा नशीन श्री. प्रभाकरजी डहाके पाटील यांनी दिली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

