उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिद्ध लेखक, फुले शाहू, आंबेडकर साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांचं मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय… वयाच्या ७० व्या वर्षी प्रा. हरी नरकें यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रा. हरी नरकें याच्या जाण्यानं समतेच्या चळवळीचा एक आघाडीचा शिलेदार हरपला आहे. त्यामुळे बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने त्यांना श्रद्धाजली पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या श्रद्धाजली सभेत मान्यवरांनी आपल्या डॉ. प्रा. हरी नरके यांचा जीवन परिचर मांडला. माणसाच्या अंगी कृतघ्नता असणे हा महत्त्वाचा गुण आहे. साठ वर्षांमध्ये सर्वांना सोडून जाणे हा प्रसंग खेदाचा व दुःखाचा आहे. वयाच्या इयत्ता दहावी अकरावीपासून डॉक्टर हरी नरके यांचा परिचय असल्याचे सांगितले. वयाच्या 30 ते 35 वर्षे अगोदर स्मृतीशेष नरके यांनी महात्मा फुलेंचे साहित्य चरित्र संपादक म्हणून काम केले आणि ते शासनाच्या साहित्यामध्ये प्रसिद्ध केले. त्यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात ओबीसी घराण्यात झाला. त्यांनी स्मशानभूमीमध्ये काम करून शिक्षण घेतले,स्थानिक सुवर्णपदके संपादन केली. ज्ञानाच्या जोरावर महाराष्ट्राला डोलावयास शिकवले, लोकांना प्रबोधन करण्याचा मार्ग स्वीकारला. पुणे विद्यापीठात माता सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे चे क्रांती लढा त्यांनी उभा केला, विद्यापीठात नाव दिले गेले परंतु नाव देऊन सुद्धा शासन परिपत्रक काढताना पुणे विद्यापीठ असाच उल्लेख करीत असे, त्यासाठी त्यांनी लढा दिला आणि परिपत्रकामध्ये दुरुस्ती करावयास भाग पाडले . जे विद्वान आणि संशोधक , समाज सुधारक असतात त्यांना मानहानीला सामोरे जावे लागते. सामाजिक विचारवंतांना वीर विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावे लागते. त्यामुळे मानसिक त्रास व चिडचिड होते. मानसिक त्रास झाला की प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये रोग ठाण मांडून बसतात. त्याला सुद्धा अपवाद डॉक्टर हरी नरके ठरले नाहीत. चळवळीत अहंकार निर्माण झाला की लोकाशी मतभेद होतात. म्हणून चळवळ माणसांना लहान मुलासारखे जपल्यावर जिवंत राहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी त्यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली होती आणि सदर पद हे राज्यमंत्री दर्जाचे होते त्यामुळे त्यांना सुमार पगाराची टेल्को कंपनीची नोकरी सोडावी लागली. फक्त महिन्याला दहा हजार रुपये इतकेच मानधन वर त्यांनी काम केले बाबासाहेबांच्या चरित्राचे सहा खंड त्यांनी प्रकाशित केले परंतु त्यांना लेखनिक अथवा प्रवास भत्ता सुद्धा दिला नाही. संघटना विहारातच होईल असा बाबासाहेबांनी मंत्र दिला, विहार हे समुद्र आहे विहारामध्ये विविध क्षेत्रातील कामे प्रत्येकाने वाटून घेणे आवश्यक आहे. समाजामध्ये जे जे चळवळ पदरमोड करून वाढीस लावतात त्यांना विरोध न करता ती वाढवण्यासाठी पोषक होणे आवश्यक आहे. समाजशास्त्र राज्यशास्त्र इतर शास्त्रज्ञ चळवळ कशी यशस्वी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचे संविधान मानणारा जो समुदाय समाज आहे तो जातीविरहित असणे आवश्यक आहे बौद्ध समाज फक्त आपला एवढेच संकुचित भाव असता कामा नये संविधान हे सर्व धर्मासाठी निर्माण केले आहे.
डॉक्टर हरी नरके यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांच्या हस्ते तसेच सोबत संचालिका शैलजा साबळे आणि दिपाली कांबळे खजिनदार एस. आर. माने सर जगन्नाथ आठवले सहखजिनदार व जेष्ठ उपासक सदस्य बोरखडे मामा यांनी अभिवादन केले. पाहुण्यांची ओळख आणि परिचय ज्येष्ठ संचालक सी. बी. चौधरी यांनी केला. विहाराचे अध्यक्ष सुधीर घोलप यांनी डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांचे आभार मानले. त्यानंतर विहाराच्या संचालिका आयुष्यमती अवंतिका वाघमारे यांचे चिरंजीव यास एमबीबीएस साठी मुंबई येथे ऍडमिशन मिळाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

