मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
एटापल्ली:- गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्व पक्ष मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या संदर्भात शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख हे उपस्थित असणार आहे.
या बैठकीमध्ये प्रचार, प्रसार माध्यमाने जास्तीत जास्त मताने गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निवडून आणणे हा मुख्य हेतू. तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागा असे आदेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी यावेळी दिले.
या बैठकीमध्ये उपस्थित अरुण धुर्वे शिवसेना उपजिल्हाप्रमुख, दिलीपभाऊ सुरपाम युवासेना जिल्हा अधिकारी, विजयाताई विठ्ठलाणी महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख, जागृती ताई कानाबार महिला आघाडी (ग्रामीण) तालुकाप्रमुख, प्रफुल भाऊ येरणे शिवसेना तालुकाप्रमुख अहेरी, अक्षय भाऊ पुंगाटी युवासेना तालुका अधिकारी एटापल्ली, अरुणाताई निकोडे महिला आघाडी तालुका संघटक, राजश्री जांभुळकर शिवसेना तालुका ग्रामीण संघटिका एटापल्ली, राहुल भाऊ आदे शिवसेना शहरप्रमुख, सुमित खन्ना युवा सेना शहर अधिकारी, दीपक दत्ता तालुका समन्वयक, तेजा भाऊ गुज्जलवार विभाग प्रमुख कसनसुर क्षेत्र, संदीप बारई उपविभाग प्रमुख गेदा क्षेत्र, मोहित दुर्गे शाखाप्रमुख, सुजल वाघमारे शाखाप्रमुख, शशांक दहा गावकर शाखाप्रमुख, यश झाडे शाखाप्रमुख, अनिकेत दहागावकर उपशाखाप्रमुख, वीरेंद्र दूर्वा तालुका प्रमुख ग्रामीण, अक्षय पुंगाटी उपविभाग प्रमुख पंदेवाही क्षेत्र, महादेव हिरा शाखाप्रमुख, विनोद मडावी विभाग प्रमुख गट्टा क्षेत्र, निहाल कुंभारे व समस्त शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.