Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

चंद्रपूर जिल्हात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 31, 2022
in तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर जिल्हात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

Ø शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित
Ø फळे, फुले, मसाला पीक लागवड व जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळ पिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन या बाबींचा समावेश आहे.

राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कट फ्लावर्सकरीता अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 1 लक्ष रुपये आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रु. प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा असणार आहे. तर इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर खर्च मर्यादा 1 लक्ष रुपये असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रु. प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा असणार आहे. कंदवर्गीय फुलांसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांकरीता प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 1 लक्ष 50 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रु. प्रती हेक्टरी अनुदान मर्यादा. तर इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 1 लक्ष 50 हजार रु. असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 रु. प्रति हेक्टर अनुदान मर्यादा असणार आहे.

सुटी फुलेकरीता अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 40 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 16 हजार प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा. तर इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 40 हजार रु. असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु.10 हजार प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. मसाला पीक लागवडीकरीता, बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकांसाठी प्रति हेक्‍टरी खर्च मर्यादा 30 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 12 हजार रु. प्रति हेक्टर अनुदान मर्यादा असणार आहे. बहुवर्षीय मसाला पिकांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 50 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार रु. प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा असणार आह.

विदेशी फळपीक लागवडीकरीता, यामध्ये ड्रॅगनफ्रुट, अंजीर व किवीसाठी प्रती हेक्टरी खर्च मर्यादा 4 लक्ष रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लक्ष 60 हजार रु. प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. स्ट्रॉबेरीसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 2 लक्ष 80 हजार रु. तर एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 1 लक्ष 12 हजार प्रती हेक्टर अनुदान मर्यादा आहे. पॅशनफ्रुट, ब्लूबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडो पिकांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 1 लक्ष रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रु. प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे.
जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 40 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त रुपये 20 हजार प्रति हेक्टर अनुदान मर्यादा असणार आहे.

विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

Previous Post

पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेल्या महिलेला माकडाने विहिरीत ढकलल, मग संपूर्ण गावात माजला हाहाकार.

Next Post

गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुक, शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जनसंपर्क कार्यालय एटापल्ली येथे आढावा बैठक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुक, शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जनसंपर्क कार्यालय एटापल्ली येथे आढावा बैठक.

गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुक, शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जनसंपर्क कार्यालय एटापल्ली येथे आढावा बैठक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In