- विध्यार्थी, नेफडो सदस्यांनी तयार केल्या मातीच्या गणेश मूर्ती.
- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरीत सेना, स्काऊट -गाईड युनिट चा अभिनव उपक्रम.
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा, आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरीत सेना, छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट, जिजामाता गाईड युनिट यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती व विसर्जन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संतोष देरकर, अविनाश दोरखंडे, वन्यजीव संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप आदे, महिला जिल्हासचिव ऍड. मेघा धोटे, सुनैना तांबेकर, अंजली गुंडावार, सर्वानंद वाघमारे, नरेंद्र देशकर, नितीन जयपुरकर, स्वतंत्रकुमार शुक्ला, मोहनदास मेश्राम, प्रदीप भावे, सुरेश गिरडकर, आसिफ सय्यद, मनोज कोल्हापुरे, विजय पचारे, राधा दोरखंडे, जयश्री धोटे, सुवर्णा बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पर्यावरणपूरक मातीचे गणेश मूर्ती निर्मिती व विसर्जन या उपक्रमात सहभागी विध्यार्थी रोहित ठाकरे याला उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार केल्याबद्दल संस्थेच्यावतीने भेटवस्तू व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. अन्य विध्यार्थी व नेफडो सदस्यांनी पण गणेश मूर्ती तयार केल्या. विधिवत या तयार केलेल्या गणेश मूर्तिची पूजा करून त्यांचे वनराई नाल्यावर विसर्जन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरीत सेना, स्काऊट -गाईड युनिट यांनी अथक परिश्रम घेतले.