मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
गडचिरोली:- राज्यात भष्ट्रचार किती फोफावला आहे हे अनेक घटनेवरून समोर येत असत आता गडचिरोली जिल्हातील अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरनेली मार्गांवर गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी बांधकाम केलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले असल्यामुळे हा पुल भाष्ट्राचारने तर नाही ना खाला असे प्रश्न निर्माण झाले आहे.
राजाराम-मरनेली पाच ते सहा किमी अंतराच मार्ग असून या मार्गांवर लहान मोठे चार पूल असून दोन मोट्या पुलांची बांधकाम गेल्या पाच महिन्यापूर्वी बांधकाम करण्यात आले आहेत, एका पुलाचे दोन्ही बाजूवर खड्डे पडले असून चारचाकी व दुचाकी वाहने निघू शकत नाही परिणामी मरनेली वासी त्या पुला पर्यन्त पायी येऊन प्रवासी वाहने पकडतात व संरक्षण भिंत ही न बांधल्याने पुलावरीलमाती दबून डांबरीकरन दोन्ही बाजूचे उकडून जात आहे.
राजाराम ते मरनेली रस्त्याचे काम सुद्धा अर्धवट डांबरीकरण झालं आहे. अर्धवट रस्त्याचे काम न झाल्याने रस्ता चिकलाने भरला आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रस्ता व पूल बांधकाम सुरु झाल्याने मरनेली वासियांना रस्ताची समस्या सुटेल अशी अपेक्षा होती परंतु अर्धवट रस्ता व पुला वरील खड्ड्या मुळे येजा करण्यास अडचणीचे जात असल्याने शासनाप्रति नाराजी व्यक्त करीत आहेत. पूल बांधकामं कंत्राटदारास सदर पुला वरील खड्डे दुरुस्ती करण्यास शक्तीचे करावे व लवकरात लवकर अर्धवट असलेला रस्त्याचे काम पूर्ण करावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.