एकाच वेळेस १५ पोलिस रोडवर, विना नंबर च्या १८ मोटरसायकल केल्या जप्त करून ५९,००० रूपयाचा दंड.
रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- शहरात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात विना नंबरच्या दुचाकी घुमट दिसून येत होत्या. विना नंबरच्या या दुचाकी अवैध व्यवसायात पण वापरल्या जात असल्याची शकता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा अवैध दुचाकी वर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
पातूर शहरातील निष्काळजीपणे चालवणाऱ्या मोटरसायकल स्वार यांच्याविरुद्ध स्पेशल ड्राईव्ह घेऊन परतुर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये लायसन्स नसणे, सायकल चालवत असताना मोबाईलवर बोलने, ट्रिपल सीट, कागदपत्र नसणे व मोटरसायकलवर नंबर नसणे यांच्यावर कारवाया करण्यात आलेले आहेत, अशा एकूण 42 मोटरसायकलवर कारवाई करण्यात आली असून 18 मोटरसायकल विना नंबरच्या मिळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्त करण्यात आलेले आहेत.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युज च्या प्रतिनिधीशी बोलताना पोलयापुढे सुद्धा अशीच कारवाई चालू राहील नागरिकांनी आपण आपल्या मोटरसायकलवर क्रमांक तात्काळ टाकून घ्यावेत अन्यथा पोलिसांना मिळून आल्यास ती जप्त करण्यात येईल असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.