Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गोंडपिपरी तालुक्यात गणरायाचे थाटात आगमन!, सर्वत्र मंगलमय वातावरण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 31, 2022
in Uncategorized
0 0
0
गोंडपिपरी तालुक्यात गणरायाचे थाटात आगमन!, सर्वत्र मंगलमय वातावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी

गोंडपिपरी:- ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ च्या जयघोषात आज, गोंडपिपरी तालुक्यात सार्वजनिक आणि घरगुती अशा हजार ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहायला मिळत आहे.

श्राद्धमय समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ सुरु होती. भाद्रपद महिना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच बुधवारी गणरायाची भक्तीमय वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली. गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी काल मंगळवारी श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवल्या होत्या. तर काही ठिकाणी आज, बुधवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग सुरु होती. ढोल, ताशांचा गजर जरी मोठ्या प्रमाणात ऐकू येत होता. श्री गणेश मुर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला. तर सायंकाळी पुन्हा पूजन, आरती करण्याबरोबरच अन्य धार्मिक विधि करण्याचा परिपाठ सुरु झाला आहे. तो श्री गणेश मूर्ती विसर्जनापर्यंत सुरु राहाणार आहे.प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने तसेच प्रत्येकाच्या रुढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. प्रशासनही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे.मृदंग, तबल्याच्या साथीने आरतीचे स्वर उमटले! घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन झाल्यानंतर अगदी आतुरतेने वाट पहाणाऱ्या लहान थोर मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला. टाळ, ढोलकी, मृदंग, तबला, हार्मोनियम आदी वाद्यांच्या साथीने सर्वत्र सुमधुर आरतीचे स्वर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक घरात उमटले.

Previous Post

बनावट कागदपत्रे तयार करून कॉम्पलेक्समधील दुकानाचा मिळविला ताबा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Next Post

हिंगणघाट शहरातील बुद्ध विहाराच्या प्रांगणात काही गांव गुंड मुलांनी मारपीट करत घातला धुमाकुळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट शहरातील बुद्ध विहाराच्या प्रांगणात काही गांव गुंड मुलांनी मारपीट करत घातला धुमाकुळ.

हिंगणघाट शहरातील बुद्ध विहाराच्या प्रांगणात काही गांव गुंड मुलांनी मारपीट करत घातला धुमाकुळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In