लेखक:- रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
महाराष्ट्रात आपल्या आवडत्या गणरायाची अष्टविनायक अशी प्रसिध्द मंदिर आहे. दि. 31 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या आणि 9 सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या गणेशोत्सवात खास आपल्या साठी “महाराष्ट्र संदेश न्युज” घेऊन येत आहे. “अष्टविनायका तुझा महिमा कसा” राज्यातील सर्व अष्टविनायक गणपतीची माहिती श्रद्धा, सुमनाने जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र संदेश न्युजचा “अष्टविनायका तुझा महिमा कसा” मध्ये आज अष्टविनायक पैकी पहिला गणपती मोरगावच्या मोरेश्वराचा महिमा आज आपण जाणून घेणार आहोत.
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’च्या जयघोषात काल, संपूर्ण देशात गणेश उत्सवाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र संपूर्ण पहायला मिळत आहे. दहा दिवस चालणारा या गणेशोत्सव राज्यात अतिशय उत्साहात आणि आंदाच्या वातावरणात साजरा केला जातो. महाराष्ट्रात राज्यात आपल्या लाडक्या गणपतीची प्रसिद्ध अष्टविनायक ठिकाणे आहेत. या गणेशोत्सवात आपण या सर्व अष्टविनायकांची माहिती महाराष्ट्र संदेश न्युजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
अष्टविनायकातील पहिला गणपती मोरेश्वराचा महिमा.
प्रसिद्ध अष्टविनायक मधील पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वरविषयी आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीला श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. मोरगाव हे श्री गणेशाचे आद्यपीठ आहे असे म्हटले जाते. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. श्री समर्थ रामदास स्वामींना सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती याच मंदिरात स्फुरली होती असं म्हटलं जातं. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे देवस्थान आहे. मोरगाव बारामतीपासून 38 किलोमीटर अंतरावर आहे.
मोरेश्वराच्या मंदिराचे आहे हे वैशिष्ट्ये
मोरेश्वराचे काळ्या दगडापासून तयार करण्यात आले आहे. गाभार्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात, बेंबीत हिरे आहेत, तर मस्तकावर नागराजाचा फणा आहे. गणपतीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत आणि समोर उंदीर आणि मोर आहेत. हे मंदिर बहामनी काळात बांधलेले आहे. गावाच्या मध्यभागी हे मंदिर असून त्याच्या चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात अनेक ठिकाणी मंदिरं उद्धवस्त करण्यात आली होती. त्यामुळे या मंदिरावर आक्रमण होऊ नये म्हणून त्याला मशिदीसारखा आकार देण्यात आला आहे.
यामुळे पडले गणरायाचे मोरेश्वर हे नाव
एका आख्यायिकेनुसार सिंधू नावाच्या
ब्रम्हदेवाने दोन वेळा घडवली मूर्ती

