श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील कालिका नगर परीसरात असलेल्या प्रसिद्ध कालिकादेवी मंदिरात चोरीच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. यावेळी मंदिरात असणारी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. जेव्हा ही घटना समोर आली त्यानंतर शिवाजीनगर पोलिस स्टेशन ला याची माहिती देण्यात आली. यावेळी घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.
बीड शहरातील कालिका नगर भागामध्ये कालिकादेवी मंदिर असून तेथील दानपेटी चोरट्याने चोरी केली आहे. दानपेटी चोरून घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद झाला आहे. त्या दानपेटीत अंदाजे 30 हजार रुपये पर्यंत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले.आणि सदर घटनेचा पंचनामा केला. यावेळी या चोरीच्या तपासासाठी डॉग स्कोड आणि फिंगर पथकाला पाचारण करण्यात आले. आता याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

