Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पिंपरी चिंचवड: रात्रीच्या सुमारास दरोडाच्या तयारीत असणाऱ्या गुन्हेगार टोळीच वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिंपरी चिंचवड: रात्रीच्या सुमारास दरोडाच्या तयारीत असणाऱ्या गुन्हेगार टोळीच वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. त्यात चोरी, हत्या सारख्या अनेक घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळ्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यात रात्रीच्या सुमारास दरोडाच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगार टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्या ताब्यातून 3 लोखंडी कोयते, मिरची पावडर 1मोबाईल फोन, 1 दुचाकी, 1 तीन चाकी अपे टेम्पो असा माल जप्त करण्यात आला आहे.

यात श्याम हरी गाढवे वय 21 वर्ष रा. शेळगाव ता.करमाळा जि.सोलापूर, आतिश भारत शिरसाट वय19 वर्ष रा. म्हसोबा सोसायटी चिंचवड, नवनाथ दिगंबर साठे वय 35 वर्ष रा. खुडूस ता.माळशिरस जि.सोलापूर, शुभम सिद्राम कांबळे वय 19 वर्ष रा. भाट नगर पिंपरी, करण उर्फ कला टाक रा. धोबीघाट पत्राशेड पिंपरी अशी सराहित गुन्हेगारांची नावे आहेत. तर जबरी चोरीत अटक केलेले प्रशांत सर्जेराव कीर्तिकुडव वय 30 वर्ष, महेश सुरेश कीर्तीकुडव वय 37 वर्ष दोघेही रा. कडोली जि. सातारा अशी चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुरुवार (ता.१७) रोजी रात्री 3.00 वाजताच्या सुमारास वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबरदांकडून पोलिसांना माहिती मिळाली की, थेरगाव येथील डीमार्ट च्या बाजूला असलेल्या जगताप कॉलनीकडे जाण्याचा रोडवर साहिल एलिगल सोसायटी समोर अंधारात चार ते पाच इसम थांबलेले आहेत. त्यांच्या कडे कोणतेतरी हत्यारे असून ते संशयपद वाटत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रात्री पाळी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईक निंबाळकर यांना कळवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी घटनेचे गांभीर लक्षात घेऊन इसमाना तत्काळ ताब्यात घेऊन कारवाई करणे बाबत सूचना केल्या. पोलीस तपास घटना स्थळी पोहचले असता सदर इसम दबा धरून बसले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मोठ्या शितफीने त्या 4 इसमाना ताब्यात घेतले. मात्र एक इसम अंधाराचा फायदा घेत पळून गेला. सदर इसमांची अंगझडती घेतले असते त्यांच्या ताब्यातून 3 लोखंडी कोयते, मिरची पावडर, 1 मोबाईल फोन, 1दुचाकी, 1तीन टाकी चाकी टेम्पो असा माल जप्त करण्यात आला आहे.

तेच दुसऱ्या घटनेत ताथवडे येथील मुंबई पुणे महामार्गावरील हॉटेल नीलकमल जवळ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 2 चोरांना पोलीस पथकातील पोलीस शिपाई लोखंडे आणि पोलीस नाईक गिलबिले यांनी पाठलाग पकडले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हे इसम वाकड परिसरातील बंद दुकाने किंवा मॉल डी मार्ट तसेच इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाचे साहित्य व इतर किमती वस्तू तेथील सुरक्षा सुरक्षकाला कोयत्याचा धाक दाखवून करीत असल्याचे निष्पम्न झाले आहे .अटक केलेले इसम सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वाकड, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, सांगवी अशा पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना रविवार (ता. 20) पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश चवजवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंतनू निंबाळकर, सहाय्यक फौजदार राजेंद्र काळे, हवलदार वंदू गिरे, पोलीस नाईक अतिक शेख, शिपाई रमेश खेडकर, पोलीस नाईक प्रशांत गिलबीले, शिपाई लोखंडे यांनी मिळून ही कारवाई केली आहे.

Previous Post

मिरज तालुक्यातील एसटी गाड्याच्या फेऱ्या सुरळीत करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्या अन्यथा रस्त्यावर उतरू: वंचित

Next Post

बीड शहरातील प्रसिद्ध कालिका देवी मंदिरात दानपेटीची चोरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड शहरातील प्रसिद्ध कालिका देवी मंदिरात दानपेटीची चोरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद.

बीड शहरातील प्रसिद्ध कालिका देवी मंदिरात दानपेटीची चोरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In