पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 70207946226
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक 20/08/2023 रोजी स्वारगेट व सहकार नगर पोलीस ठाणे हद्दीत युनिट 02 कडील अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व संजय जाधव यांना त्यांचे गुप्त बातमी दराकडून बातमी मिळाली की, घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार नामे जयवंत उर्फ जयड्या गायकवाड हा मीनाताई ठाकरे वसाहत येथे पांढऱ्या रंगाची आपाची गाडीसह उभा असून त्याच्याजवळ घरफोडी चोरीतिल सोनं विक्री करण्यासाठी आलेला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 107 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी गाडी, दागिने वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यार असा सर्व एकूण 6,30,750/- रु चा मुद्देमाल मिळून आल्याने, त्याबाबत खात्री केली असता समर्थ पोलीस स्टेशन गु.र.क्र.186/2023 भादवी 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल असून खात्री करून पुढील कारवाई कामी समर्थ पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे….
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री. सुनील तांबे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, , संजय जाधव ,गजानन सोनुने , अमोल सरडे ,पुष्पेन्द्र चव्हाण ,निखिल जाधव, गणेश थोरात ,साधना ताम्हाणे ,विनोद चव्हाण ,मोहसीन शेख, प्रमोद कोकणे, राजपुरे व नागनाथ राख या पथकाने केलेली आहे

