अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- शहरातील कन्नमवार विद्यालय येथील सिंगापूर येथे उच्च पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थिनी कुमारी रमा राजाभाऊ देशपांडे यांच्या याच्या वतीने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेचे पर्यवेक्षक ठाकूर, शाळेच्या माजी उपमुख्याध्यापिका गिरधर मॅडम, रमा देशपांडे त्यांचे आई आणि वडील, दहेगाव मुस्तफाचे मुख्याध्यापक नयनसिंग चव्हाण शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी देशपांडे यांनी आपल मनोगत व्यक्त केले. मी सिंगापूर येथे उच्च पदावर कार्यरत आहे आज मी ही यशाची शिखरे गाठली त्याची संपूर्ण श्रेय मला शाळेतील मिळालेल्या बाळकडू मुळेच होय म्हणून मला माझ्या शाळेसाठी काहीतरी करायचं आहे. आज भाषेचे व क्रीडाचे महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे त्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये भाषेची व क्रीडाची गोडी निर्माण व्हावी करिता शाळेतील भाषेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या व उत्कृष्ट क्रीडापटूंचा सन्मान करण्याचा माझा उद्देश आहे त्यामुळे या वर्षी प्रमाणे दरवर्षी सुद्धा भाषेतील सर्वाधिक गुण प्राप्त करणारे व उत्कृष्ट क्रीडापटू यांचा सन्मान करण्याचे निश्चित केले आहे.
या कार्यक्रमाच्याप्रसंगी मागील शैक्षणिक क्षेत्रामध्ये मराठी विषयांमध्ये जास्त गुण मिळवणारी कुमारी वैष्णवी कोवे, उर्दू विषयांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारी अशमीरा सदफ व व शाळेतील उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू कुमारी अक्षरा नंदागवळी व कुमारी नेहा काळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका पुनसे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री साव सर यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348