प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज देण्यात यावे याकरिता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या नेत्यांनी भेट घेऊन केली अर्धा तास चर्चा केली. यावेळी हिंगणघाट तालुका हा वर्धा जिल्ह्यातील मोठा तालुका आहे हा लोकसंख्येने सर्वात मोठा असला तरी शैक्षणिक, आरोग्य व औदयोगिक सुविधा विषयक बाबतीत अत्यंत मागासलेला आहे. हिंगणघाट शहरामध्ये पाणी, जमीन, विज, रस्ते व रेल्वेची उपलब्धता असुनही आरोग्य बाबत व शैक्षणीक रित्या खूपच मागासलेला आहे. हिंगणघाट शहराला मोठा इतिहास आहे. “समाजसेवी बाबा आमटे” यांचे जन्मस्थान, तसेच ग्रेट ट्रीग्नोमेट्रीकल सव्हे॔ ऑफ इंडियाचे जनक कर्नल विल्यम लॅम्बटन स्मुती स्थळ” हे हिंगणघाट येथे आहे.
वर्धा जिल्हातील हिंगणघाट व समुद्रपुर तालुका मोठा असल्याने प्रशासकीय दृष्ट्या सिंधी रेल्वे, मांडगाव व अल्लीपुर हे तीन गाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ब्रिटीश काळात हिंगणघाट ही बाजारपेठ कापसासाठी प्रसिद्ध होती. मॅचेस्टर रेडिओ वरून हिंगणघाटच्या कापसाचे भाव सांगत होते. त्यावेळस वर्धा शहर तुलनेत कुठेच नव्हते. आजही आंध्रप्रदेश, तेलंगना या भागातून यवतमाळ, नागपुर, भंडारा, गडचिरोली जिल्हातील बाजारपेठेत हिंगणघाटचा माल विकला जातो. हिंगणघाटमध्ये दोन हजार तीनशे कोटी अधिक उलाढाल असलेली कृषी उत्पन्न बाजारपेठ आहे. हिंगणघाट वर्धा जिल्हाला सर्वात जास्त महसूल देणारे शहर आहे. मात्र राजकीय शक्तिच्या अभावामुळे हे शहर दुर्लक्षीत झाले आहे. आज तुलनात्मक अभ्यास केला असता. वर्धा शहराच्या तुलनेने शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य विषयक क्षेत्रात हिंगणघाट शहर 90% मागासलेले आहे. याची जाणीव हिंगणघाट रहीवासी प्रत्येक नागरिकांना असल्यामुळे धरणे आंदोलन, मुंडण आंदोलन, मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन अशे वेगवेगळ्या प्रकारे ४ महिन्यापासून सतत आंदोलने सुरू आहे.
या आधी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासह विविध राजकीय पक्ष व संघटनेस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांना निवेदन देण्यात आले वर्धा जिल्ह्यात मेडिकल कॉलेज हिंगणघाट मध्येच का पाहिजे या बाबत चर्चा केली त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली व तिथेही शिष्टमंडळासह चर्चा केली असता जयंत पाटील यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडला. अशा अनेक निवेदने आंदोलने मेडिकल कॉलेजसाठी हिंगणघाट येथे सुरूच आहे.
हिंगणघाटातील लोकांचे शैक्षणिक व आरोग्यविषय दुःख, वेदना दर्शविते. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. हिंगणघाट शहराचे, वर्धा व इतर कुठल्याही शहराच्या तुलनेत वास्तव असल्यामुळे हिंगणघाट शहराला केंद्र व राज्य सरकारने शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट मध्येच द्यावे आणि ते आवश्यक आहे असे शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना चर्चेदरम्यान सांगितले. यावेळी चर्चेला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, अडव्होकेट श्री माथंनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
हिंगणघाट शहरात (GMC) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सतत ४ महिन्यापासून वेगवेगळ्या प्रकारे येथील संघर्ष समिती, विविध राजकीय पक्ष, विविध संघटना आंदोलने करीत आहे. हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज आल्यास येथील तरुणांना शिक्षणाची, नोकरीची संधी इथेच प्राप्त होईल, शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल त्यांचा हाताला काम मिळेल व शहराची भौगोलिक दृष्टीकोनातून मोठ्या प्रमाणात प्रगती होईल शहरात मेडिकल कॉलेज येणे हा येथील जनतेचा जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट शहरात आल्यास येथील शैक्षणिक, आरोग्याविषयी व आर्थिक स्थिती सुधारू शकते व मेडिकल कॉलेज हिंगणघाट तालुक्यासाठी, शहरासाठी येथील जनतेसाठी प्राणवायू ठरू शकते: अतुल वांदिले प्रदेश सरचिणीस राष्ट्रवादी काँगेस पार्टी.