✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने पोलिस अधीक्षक, नूरुल हसन यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे,जिवाने मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगार बंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, शासकिय कर्मच्याऱ्यांवर हल्ला करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१) (अ) (ब) अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्या बाबात आदेशीत केले होते.
त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट व वडनेर येथील पोलिस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरुन उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट यांचे आदेशान्वये खालील नमुद सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातुन तड़ीपार केले आहे. त्यात १) अविनाश उर्फ बदी रमेश भाईमारे वय २८ वर्ष रा गाडगेबाबा वार्ड शितलामाता मंदिरा जवळ हिंगणघाट २) अजय रामचंद्र पवार वय २९ वर्ष रा. फुकट ता. हिंगणघाट ३) आकाश धनाजी बावणे वय २१ वर्ष रा. फुकट ता. हिंगणघाट ४) अनंता भानुदास मेंढे वय ३२ वर्ष रा. टाकळी ता हिंगणघाट ५) अमोल भिमराव भगत, वय ३८वर्ष रा. टाकळी ता. हिंगणघाट ६) दिलीन नानाजी सातघरे वय ३६ वर्ष रा दोदुर्डा ता. हिंगणघाट सदर आदेश तामील करीता पोलिस स्टेशन हिंगणघाट व पोलिस स्टेशन वडनेर येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर तडीपार गुन्हेगारांचे शोध संबंधाने युध्द स्तरावर मोहीम राबवुन त्यांचा शोध घेवून अंमलबजावणी करण्यात येणार असुन त्यांना वर्धा जिल्हयातुन घालवुन देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक, नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक, डॉ.सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मारुती मुळुक, पोलिस स्टेशन हिंगणघाट आणि स.पो.नि संजयकुमार मिश्रा पोलिस स्टेशन वडनेर, पो. नि. संजय गायकवाड, स्था. गु.शा. वर्धा तसेच पो उप नि. ओमप्रकाश नागापुरे, पो. शी दिनेश करलुके यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

