अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- बहुप्रतिक्षित आगामी ‘सुभेदार’ चित्रपट 25 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत असल्याने सहयाद्री प्रतिष्ठाण पेण विभागाने मोरेश्वर चित्रपट गृहात सुभेदार हा चित्रपट येत असल्याने आज दि 23 ऑगस्ट रोजी सहयाद्री प्रतिष्ठाण हिंदुस्थान कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, युवनेते मंगेशभाई दळवी, सहयाद्री प्रतिष्ठाण पेण विभाग अध्यक्ष प्रवीण पाटील माजी अध्यक्ष केतन म्हात्रे, रोशन टेमघरे आणि शेकडो संख्येने दुर्गसेवक उपस्थित राहून चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले.
यावेळी समीर म्हात्रे आणि मंगेश भाई यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेले आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम या इतिहासातील एक महत्त्वाची सुवर्णगाथा आहे. ही सुवर्णगाथा 25 ऑगस्टला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातून प्रेकक्षकांसमोर उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टका’तील हा पाचवा चित्रपट आहे.
दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ चित्रपट श्रुंखलेतील ‘र्फजद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनिखड’, ‘शेर शिवराज’ हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. आता ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. राज्यातील अनेक चित्रपटगृहांसह, देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच ६ विविध देशांमध्ये ‘सुभेदार’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘सुभेदार’ चित्रपटामध्ये, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढारकर आदी मराठीतील दिग्गज कलाकार दिसणार आहेत.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमासोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर, कुटुंबाने दिलेली मोलाची साथ याचे दर्शन ‘सुभेदार’ चित्रपटात होणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445318/7385445348