Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: प्रेमिकेचे लाड पुरवण्यासाठी त्याने चक्क मोटर सायकल चोरीचा सपाटा लावला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 26, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: प्रेमिकेचे लाड पुरवण्यासाठी त्याने चक्क मोटर सायकल चोरीचा सपाटा लावला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- प्रेमात मनुष्य हा आंधळा होतो असं उगचं नाही म्हणतात. अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.मुंबई महानगर मधील मालाड मधून समोर आली. आपल्या प्रेमिकेचे लाड पुरवण्यासाठी प्रियकर चक्क चोर बनला आणि अखेर तुरुंगाची हवा खावी लागली. या दुचाकी चोरणाऱ्या आरोपी प्रेमिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अनिल भीमराव निंबाळकर असे अटक आरोपीचे नाव आहे.

आरोपी अनिल भीमराव निंबाळकर हा मालवणी येथील रहिवासी असून तो मेकॅनिकचे काम करतो. त्याने आपल्या प्रेमिकेला खुश करण्यासाठी चक्क दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला पण पोलिसांनी त्याला मोठ्या शितापिने अटक केली आरोपीकडून चोरी केलेल्या सहा ॲक्टिव्हा दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

काय आहे घटना? मुंबई येथील बोरीवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्कूटी या दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत होत्या. बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरीचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी मालाड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपीला मालाड येथून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 6 ॲक्टिव्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीवर बोरिवली, दहिसर, चारकोप आणि कस्तुरबा येथे सहा गुन्हे दाखल आहेत.

पेशाने मेकॅनिक असल्याने आरोपी काही मिनिटांत स्कूटी चोरून पळून जायचा. प्रेयसीला खूश करण्यासाठी आरोपी रोज नवीन अ‍ॅक्टिव्हा चोरायचा. प्रेयसीला स्कूटीवरुन फिरवायचा. मग जिथे स्कूटीचे पेट्रोल संपायचे, तिथेच तो स्कूटी सोडून दुसरी स्कूटी चोरून पळून जायचा. अखेर त्याचा हा कारनामा पोलिसांच्या लक्षात आाला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

अहिल्याआई होळकर एसटी पास सवलत योजनेची संपूर्ण सांगली जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करा: वंचित बहुजन आघाडी.

Next Post

लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत टोळी प्रमुख अजय राजेंद्र माकर व रोहित दत्ता मंजुळे दोन वर्षांकरिता तडीपार….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील  रेकॉर्डवरील सराईत टोळी प्रमुख अजय राजेंद्र माकर व रोहित दत्ता मंजुळे दोन वर्षांकरिता तडीपार….

लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत टोळी प्रमुख अजय राजेंद्र माकर व रोहित दत्ता मंजुळे दोन वर्षांकरिता तडीपार....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In