वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली, दि. २४ ऑगस्ट:- अहिल्याबाई होळकर योजना या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५वी ते १०वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. ही सवलत आता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनीं करीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे. परंतु सद्यस्थितीत मिरज तालुक्यात एवम सांगली जिल्ह्यात या योजनेची काटेकोर अंमलबजावणी होत आहे असल्याचे दिसून येत नसल्याचे दिसत आहेत.

मुलींना शिक्षण घेण्यासाठी अहिल्याआई होळकर योजना खूप उपयुक्त आहे. स्त्री शिक्षणाचा हा पाया आहे असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे आहिल्याआई होळकर बस सवलतीची मिरज तालुक्यातील एवंम सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक शाळेत लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी मुख्याध्यापक यांच्याकडून तात्काळ आगारप्रमुख यांना पाठवून द्यावी व सर्व लाभार्थी विद्यार्थिनींना शासन सवलतीचा योग्य लाभ मिळवून द्यावा असे निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजू मुलानी, नजीर झारी, आनंदसागर पुजारी, विशाल धेंडे, सागर आठवले, नविनकुमार कांबळे, सतीश शिकलगार, पवन वाघमारे, रतन तोडकर, स्वप्नील खांडेकर, निशांत भंडारे, मेजर कुमार कांबळे आदी उपस्थित होते.

