पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत टोळी प्रमुख अजय राजेंद्र माकर राहणार गोरे वस्ती रोड वाघेश्वर नगर वाघोली पुणे व टोळी सदस्य रोहित दत्ता मंजुळे राहणार वाघेश्वर नगर वाघोली पुणे, आकाश राजू दंडगुले राहणार वाघेश्वर नगर वाघोली पुणे, हर्षद कुमार शिंदे राहणार लोणीकंद तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या हालचाली सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण करतील अशा झाल्या होत्या आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक बनले होते. त्यामुळे लोणीकंद पोलीस ठाण्याने सदर आरोपींच्या विरोधात अभ्यासपूर्वक तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ 4 ,पुणे शहर यांच्याकडे पाठविला होता. त्याचे अवलोकन करून मा. पोलीस उपायुक्त श्री शशिकांत बोराटे यांनी तडीपार आदेश क्रमांक 33/2023 म पो का कलम 55 अन्वये दिनांक 22/08/2023 पासून वर नमूद तीनही आरोपींना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातून पुढील दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहेसदरची कामगिरी मा़. अप्पर पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारूती पाटील, सौ सीमा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केली.

