मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्याकरीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर मध्ये होण्या करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीलांकृती समिती चा संघर्ष सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलना चा काल ९० वा दिवस होता. मेडिकल कॉलेज करीता महिलांच्या कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे दर रविवारी आंदोलन करण्यात येते. ह्या रविवारी महिलांनी काळे पेले दाखऊन सरकार चे लक्ष वेधले.
विरोधी पक्ष नेते, राका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व हिंगणघाट विधानसभेचे आमदार समिरभाऊ कुणावर ह्यांनी विधान सभेत हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये जनतेची मागणी आहे ह्या संबंधी प्रश्न केला. त्यावर प्रतिउत्तर म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करून कॉलेज चे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याचे संगितले. अशा रीतीने कॉलेज हिंगणघाट येथे येण्यासाठी विविध प्रयत्न आताही सुरू आहेत.
यावेळी महिला कृती समितीच्या आंदोलकांनी हे आंदोलन तसेच पुढे रेटायचे ठरवले. त्यानुसार ९० व्यां दिवशी महिलांनी हातात काळे पेले दाखऊन प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधीं विषयी रोष दाखवला. वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास सर्व सुनियोजित कृती कराव्या अन्यथा आंदोलन चालूच राहील असा इशारा शासकीय वैद्यकीय महविद्यालय महीला कृती समिती नी दिला होता. यामध्ये प्रामुख्याने सावित्री च्या लेकी सामाजिक संस्थाच्या राजश्री बांबोळे, सुचिता कांबळे, मोनाली फुलझेले, रूपा सोरदे, वंदना थुल, राशी मेश्राम, लीला थुल, संगीता लभाने, सिंधू दखणे, रेखा थुल, मोनिका पाटील, शारदा जामुनकर, संध्या जगताब, अश्विनी निमसरकार, सखूबाई वासेकर, शोभा पाटील, प्रीती चव्हाण इ. उपस्थित होत्या तर पुरुषांपैकी संदेश मून,अनिल कडू,रमेश लोंढे, रुपेश लाजूरकर, श्याम इडपवार इत्यादी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

