उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा सांगली मध्ये शासकीय विश्रामगृह येथे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमरफारुक ककमरी आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय वाघमारे यांच्या उपस्थितीत आणि सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची आढावा आणि विस्तार बैठक संपन्न झाली त्या वेळेस जत तालुका विस्तार करण्यासाठी नवीन निवडी करण्यात आले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी संघटनेची सद्या वाटचाल आणि पुढील नियोजन या बद्दलची माहीती दिली त्यावेळेस संस्थापक अध्यक्षांनी आज पर्यंत केलेल्या यशस्वी वाटचाली बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि वाटचालीत सक्रिय सहभाग घेऊन काम करण्याबद्दल प्रोत्साहन देत म्हणले कि राजकारण विरीहीत सामाजिक भान ठेवून प्रत्येक क्षेत्रातील कर्तव्यदक्ष कामाबद्दल काम करणाऱ्या प्रतेकास सेवक कामगार संघटनेत काम करण्याची संधी आहे. तसेच पढील वाटचालीतील ध्येय व धोरणाबद्दल माहीती संस्थापक सचिव फिरोज मोमीन यांनी दिली.
यावेळी सांगली जिल्हा संघटक सुबान देशमुख आणि सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या नियुक्तीनुसार जत तालुकाध्यक्ष पदी साहेबराव उबाळे तर महासचिव पदि इंजिनिअर अभिषेक छाबरे आणि तालुका उपाध्यक्ष पदि इस्माईल शेख यांची निवडी करण्यात आले पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले त्यावेळेस विकी होळकर, प्रथमेश बनसोडे, अलोक कांबळे, शुभम चंदनशिवे, आकाश भोसले आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445648

