राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील डोंगरगाव येथे आज तहकूब ग्रामसभा घेण्यात आली या ग्राम सभेत विविध कामांचे नियोजन करणे तसेच कृषी विभागाच्या वतीने शेतकरी बांधवांना कृषी सहायक याणी माहीती दिली त्या नंतर महात्मा गांधी तंटामुक्त समिती ची नीवड करण्यात आली यात महिला विरूद्ध पुरुष असी काही परिस्थिती निर्माण झाली होती पण महीलाने एकही पुरूष आमच्या समीती मध्ये नको असी भूमिका घेतल्याने पुरुषाना माघार घ्यावी लागली व श्रिमती कमलाबाई गुरणूले ही महिला तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष झाल्या आणी उपाध्यक्ष म्हणून रंजीता दुधकोहर हे झाले त्या समीती मध्ये सदस्य म्हणून सौ. लता राजेंद्र झाडे सौ. रंजीता सत्यपाल गूरणूले, सौ. अणिता अनील शेडमाके, सौ. निमाबाई गुरुदास कावळे, सौ. कविता रवींद्र वाढई, श्रिमती अरुणा नथ्थू लसंते, सौ प्रिती अंकुश जूनघरे, सौ दर्शना रमेश उईके यांची निवड करण्यात आली.
यांची निवड झाल्या नंतर तडकाफडकी या महिलांनी काम करायला सुरुवात केली. लगेचच दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढला आणी आजपासून दारू विक्री करायची नाही असा दम दिला या नंतर या महिला एकत्र राहुन खरंच गावातील दारू बंदी करतील का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

