हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथून एका नराधम बापाने स्वतःच्याच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बापानेच विकृतपणाचा कळस ओलांडल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
बल्लारपुर शहरातील शिवाजी वार्ड येथील नराधम बापाने स्वतःच्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला. धक्कादायक बाब अशी की, आपल्या पती आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार करतो हे पिढीत मुलीचा आईला आणि भावाला माहित होते. या घटनेनंतर पीडित मुलीने आपली बापा विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नराधम बाप आपल्या 15 वर्षीय मुलीवर मागील अनेक दिवसापासून बलात्कार करत होता. या नराधम बापाने विकृत कृत्य करून पीडित मुलीला धमकी दिली. त्यामुळे अनेक दिवस ही पीडित मुलगी गप्प राहिली होती.अखेर तिच्या प्रकृतीच्या तक्रारीनंतर नराधम बाप विरोधात तक्रार दाखल करून आई आणि भवा विरोधात तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बल्लारपूर परिसरामध्ये खळबळ पसरली आहे.
या विकृत घटनेचा तपास बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करीत आहे. नराधम बापा विरोधात बलात्कार आणि बालक लैंगिक शोषण प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
या नराधम बापाने आपल्याच मुलीवर बलात्कार करून मुलगी आणि पित्याच्या नात्याला काळीमा फासली आहे. बापाच्या या कृत्याने आजूबाजूच्या परिसरासह शहरामध्ये खळबळ माजली आहे. या बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याने अनेकजण याबाबत संताप व्यक्त करत आहेत. तसेच या नराधम बापाला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे अशी संतप्त भूमिका परिसरातून व्यक्त केली जात आहे. या नराधम बापाच्या या विकृत कृत्याला पोलीस काय शिक्षा करणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445648

