विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील एक बँकच्या एटीएम मशीन मधून 500 रुपयाच्या बनावटी नोटा मिळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बँकेने एक व्यक्ती विरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
कार्डद्वारे एटीएम मशीन मध्ये कॅश डिपॉझिट करताना एका व्यक्तीने 500 रुपयांच्या बनावट 16 नोटांचा भरणा करून आयसीआयसीआय बँकेची 8 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या स्टेशन रस्त्यावरील शाखेचे उपव्यवस्थापक महादेव वसिष्ठ नायकोडे वय 32, रा. सारसनगर, अहमदनगर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोहन जीवाराम लाल याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सीएमएस इन्फो सिस्टम एजन्सी, सारसनगर ही एजन्सी प्रत्येक दिवशी एटीएम कॅश डिपॉझिट मशिनमधून जमा झालेली रक्कम आयसीआयसीआय बँकेत जमा करीत असते. नायकोडे, बँक व्यवस्थापक राजीव गोल्हार, रोखपाल वैष्णवी फुलारे यांच्या समक्ष 18 जुलै रोजी सकाळी सीएमएस इन्फो सिस्टम एजन्सी यांच्या प्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे कॅश डिपॉझिट मशिन उघडले.
त्यावेळी एटीएम मशीन मध्ये 500 रुपयांच्या 16 नोटा बनावट असल्याचं आढळून आल्या. दरम्यान, कॅश डिपॉझिट मशिनमधील ट्रॅन्झॅक्शनची तपासणी केली. त्यावेळी मोहन जीवाराम लाल याच्या मोबाईल व बँक खात्यावरून एटीएम कार्डद्वारे कॅश डिपॉझिट मशिनमध्ये बनावट नोटांचा भरणा झालेला होता असे दिसून आले.
आयसीआयसीआय बँकेने करन्सी चेस्ट पुणे यांनी बँकेला कळविले आहे. यानंतर गुरुवारी 31 ऑगस्ट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

