संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर :- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक नराधम मुलाने आपल्याच जन्मदात्या आई निर्घृण हत्या केली. त्यामुळे नागपुर शहरात एकच खळबळ उडाली आहे. जन्मदात्या आईची हत्या केल्याची ही घटना गुरुवारी रात्री घडली दुर्गा रतन मेश्राम वय 50 वर्ष रा. संजय गांधी नगर, गोंड मोहल्ला, राणी दुर्गावती चौक असे मृत महिलेचे तर अंकित वय 25 वर्ष असे आरोपी मुलाचे नाव आहे.
आरोपी अंकित हा पेटिंगची कामे करायचा घरची परिस्थिती बेताची होती. त्यात मृतक दुर्गा रतन मेश्राम यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावली होती. सतत आजारी आईच्या आजारपणामुळे तो कंटाळला होता. त्यामुळे त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.
प्राप्त माहितीनुसार गुरुवारी रात्री दुर्गा यांच्या गाल, गळ्याजवळ शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. त्यांना मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यावेळी मुलगा अंकित हादेखील तेथे होता. मात्र कुणालाही त्याच्यावर शंका आली नाही. प्रिया यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने त्याच्या जबानीमध्ये विसंगत माहिती दिली व त्यामुळे पोलिसांना संशय आला. ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर व त्यांच्या पथकाने त्याला दरडावून विचारले असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांना आरोपी अंकित म्हणाला, आई (दुर्गा) या बेडवरच असल्यामुळे जेवण, स्वच्छता, औषधपाणी त्यालाच करावे लागायचे. सोबतच त्याला धुणीभांडी, साफसफाई, कचरादेखील उचलावा लागायचा. यामुळे तो कंटाळला होता. त्यातूनच त्याने हत्या केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

