मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आलापल्ली:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संरक्षक महाउपासिका मिराताई आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 03 सप्टेंबर रोज रविवार ला सकाळी 6.00 वाजता संघ मित्रां बुध्द विहार अल्लापल्लि येथे वर्षावास धम्म प्रवचन 13 व्या मालिकेत प्रा. संजय पाठाडे कोषाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा गडचिरोली दक्षिण यांचे चारब्रम् विहार या विषयावर सखोल प्रवचन झाले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बी.एम दुर्गम सर, तालुका अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा अहेरी तालुका यांनी केले. तर आभार दिनेश चालूरकर, कार्यालयीन सचिव भारतीय बौध्द महासभा
गडचिरोली दक्षिण यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य उपासक, उपासिका उपस्थित होते.
यावेळी पंच फुला फ़ुलझेले, कल्पना वाघमारे, मंगला झाडे, नंदा करमरकर, पिंगला उंदीरवाडे, माया दुधे, कविता करमे, सिंधुताई तावाडे, साधना भगत, एम जी देशभरातर, लैजा चालूरकर, दामोदर राउत, देविदास वाघमारे, कार्तिक निमसरकार, जयंत गजभिये, वामन भगत, बी एम दुर्गम, दिनेश चालूरकर, संजय पाठाडे, राजू करमे, रवींद्र बरसिंगे, भीमराव झाडे, शोभा दुर्यांधन आदी बौध्द उपासक, उपसिका मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

