मंगेश सावरकर, नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातील उमया शंकर शाळेतील (कोटा कॉलनी) येथील विद्यार्थीनीनी रक्षाबंधनानिमित्त लकडगंज पोलीस स्टेशन मधील पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सह पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली. यावेळी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील भगिनींच्या रक्षणाचे वचन दिले.
रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही सण, पोलिसांना शहरातील शांतता, कायदा सुव्यस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनासारखा सण साजरा करता येत नाही. त्यामुळे नागपुर शहरातील उमया शंकर शाळेतील (कोटा कॉलनी) मधील विद्यार्थीनीनी यंदाचे रक्षाबंधन पोलिसांसोबत साजरे करण्याचे ठरवले. आम्हाला अनेकदा कामामुळे आमच्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करता येत नाही, आज शाळेतील लहान लहान बहिणींनी आमच्या सोबत रक्षाबंधन साजरे केल्याने, आम्हालाही अत्यंत आनंद झाल्याची भावना पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी शाळेतील मुली, शिक्षक आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी या शाळेतील मुलींना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे लकडगंज पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

