अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- विभाग नियंत्रक कार्यालयात कार्यरत प्रवीण तेलगोटे वरिष्ठ लिपिक यांनी यापूर्वीही त्यांची नियमबाह्य करण्यात आलेल्या बदलीवर दिनांक 22 मे 2023 रोजी विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांना निवेदन सादर केले होते. त्यानुसार त्यांनी सर्व बाबी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या तरी सुद्धा त्यांच्या निवेदनाची सहानभूतीपूर्वक विचार केला नाही, किंवा कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.
प्रवीण तेलगोटे वरिष्ठ लिपिक असून त्यांच्यापेक्षा एका शाखेत तीन वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले एकुण ०७ वरिष्ठ लिपिक आहेत. त्यांची बदली न करता प्रवीण तेलगोटे हे नियमबाह्य काम करत नसल्यामुळे त्यांची विभाग भांडार शाखेत बदली करण्यात आली आहे. सदर बदली ही प्रवीण तेलगोटे मागासवर्गीय म्हणजेच बौद्ध समाजाचे असल्यामुळे करण्यात आली आहे. असे प्रवीण तेलगोटे यांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
प्रवीण तेलगोटे वरिष्ठ लिपिक हे दिनांक 22 ऑगस्ट 2023 पासून विभाग नियंत्रक राप अकोला कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत. 02 सप्टेंबर 2023 रोजी त्यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना अकोला शहरातील सर्वोच्च रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले होते. प्रवीण तेलगोटे यांची प्रकृती खालावल्यानंतरही शुभांगी शिरसाट विभाग नियंत्रक राप अकोला यांनी त्यांना भेटून उपोषण मागे घेण्यासंदर्भात कुठलेही आश्वासन किंवा लेखी पत्र दिले नाही. म्हणून दिनांक 4 सप्टेंबर रोजी पासून प्रवीण तेलगोटे हे परत उपोषणास बसलेले आहे. यावेळी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभांगी शिरसाट यांची भेट घेऊन प्रवीण तेलगोटे यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी व त्यांना विभाग नियंत्रक याच इमारतीमध्ये दुसऱ्या टेबलवर नियुक्ती द्यावी. याबाबत विनंती केली परंतु शुभांगी शिरसाट हे प्रवीण तेलगोटे बौद्ध समाजाचे असल्यामुळे त्यांच्यावर जाणीवपूर्वक अत्याचार करत आहेत.
प्रवीण तेलगोटे यांनी सांगितले की शुभांगी शिरसाठ हे माझ्या बदलीसाठी पैसे मागत आहेत म्हणून मी आपणास नम्र विनंती करतो की, प्रवीण तेलगोटे यांचे 22 ऑगस्ट 2023 पासून सुरू असलेल्या उपोषणामुळे प्रकृती खालवली असून त्यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी. व शुभांगी शिरसाट विभाग नियंत्रक रा प अकोला हे कर्मचाऱ्यांचे जीवावर उठलेले अधिकारी असून त्यांची तात्काळ हकापट्टी करण्यात यावी.व ॲट्रोसिटी एक्ट नुसार कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तीव्र आंदोलन छेडेल अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे यांनी अजित कुंभार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348