🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- आज वर्धा जिल्हातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि गांजाची तस्करी सुरू आहे. त्यात नागपूर- अमरावती महामार्गावर कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव फाटा परिसरात कारमधून नेत असलेला तब्बल 265 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 26 लाख 50 हजार रुपये आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या चमून ही कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या नागपुर– अमरावती महामार्गावर बोरगाव फाटा येथे सापळा रचला. छापा टाकला असता कारच्या मागील सीटमध्ये बॉक्स करून त्यात व डिक्कीमध्ये गांजा आढळला. पोलिसांनी कार तसेच 26 लाख 53 हजारांचा 265 किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी गांजा, कार, मोबाईल असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत कारंजा पोलिसांच्या स्वाधीन केले.