🖋️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधि
नाशिक:- शहरातून एक खबळजनक घटना समोर आली आहे. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य, स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तसेच सुखशांती घरात नांदण्यासाठी पूजा करावी लागेल त्यामुळे तुमचं सर्व चांगल होईल असे सांगून पूजा करण्याच्या बहाण्याने एका महिलेने तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. पूजा करताना मातीच्या भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून महिलेने दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आज समाजात अंध्यश्रद्ध्येचा नावाने सरास बाजार मांडला आहे. फसवेगिरी करून अनेकांना लुबडल्या गेलं आहे. असच एक प्रकरण घडल एका महिलेने पखाल रोडवरील एका कुटुंबास लक्ष करून पूजा करण्याच्या बहाण्याने गंडा घातला. अफरोज अकिल शेख वय 42 वर्ष रा. साहिल पार्क, पखाल रोड यांच्या फिर्यादीनुसार, जुलै ते 30 ऑगस्टदरम्यान रिहाना नामक महिलेने गंडा घातला. संशयित रिहाना हिने अफरोज यांच्यासह एस. शेख या महिलेस चांगले आरोग्य व कुटुंबात सुखशांती मिळवून देण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगितले. पूजेसाठी काही सोन्याचे दागिने लागतील, असे दोघींना सांगितले. 29 ऑगस्टला एस. शेख यांच्या घरात पूजा करण्यात आली. पूजेसाठी आणलेले तीन तोळ्याचे दागिने रिहानाने मातीच्या वाटीत बंद करून बेडरूममधील कपाटात ठेवण्यास सांगितले. शेख यांनी दुसर्या दिवशी मातीची वाटी उघडून पाहिले असता त्यात दागिने नसल्याचे पाहताच धक्का बसला. अफरोज शेख यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात रिहानाविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. संशयित महिला फरार असून, पोलिस तिचा शोध घेत आहे.
नागरिकांच्या अज्ञानपणाचा, भीती दाखवून, असहायतेचा गैरफायदा भामटे घेत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना लक्ष करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने नेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यात एका घटनेत दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी दागिने लंपास केले. एका टोळीने नागा साधू बनून, तर एकाने तोतया पोलिस बनून ज्येष्ठ नागरिकांकडील सोन्याचे दागिने नेले आहेत.