मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात भारतीय जनता पार्टीत आमदार आणि माजी खासदार यांच्यात वाद पेटला आहे. या आमदार विरुद्ध माजी खासदार आत्मक्लेश करणार असल्याचे समोर आल्याने भाजपा मध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
वर्धा शहर व ग्रामीण मंडळातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठकीत वर्धा विधानसभेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी कार्यकर्त्यांसंदर्भात अपशब्द वापरले, असा खळबजनक आरोप माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी केला.
कार्यकर्त्यांसंदर्भात अपशब्द वापरलेल्या घटनेला आठ दिवस होऊनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने त्यांनी भाजप जिल्हा कार्यालयात शनिवारी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय सोशल मीडियावरील फेसबूक लाईव्हमधून जाहीर केल्याने भाजपा मध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे या घटनेनं राजकीय खळबळ उडाली आहे.
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमोर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी चर्चा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामध्ये ‘वर्ध्यात २ सप्टेंबरला भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची आयोजित करण्यात आली होती. भाजपाच्या या बैठकीत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी नागपुरला जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात अपशब्द वापरले असून त्यांचे हे वर्तन चुकीचे आहे. भाजपने नेहमीच कार्यकर्त्यांचा आदर केला आहे. कार्यकर्ते ही भाजपच्या रथाची चाके असून त्यांच्यामुळेच पक्ष आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांचा मान राखतात. परंतु आमदारांकडून याच कार्यकर्त्यांना असे शब्द वापरणे योग्य नाही, त्यांनी याबद्दल कोणतीही खंत व्यक्त केली नाही, असेही माजी खासदार सुरेश वाघमारे म्हणाले.
यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष गफाट यांना माहिती असून आठ उलटूनही कोणताच ठोस निर्णय घेतला गेला नसल्यामुळे कार्यकर्त्यांच्या सन्मानाकरिता हा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही ते व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणाले. यावरुन भाजपात खदखद सुरु असून पुढे काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

