राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागासलेला तालूका जिवती येथील नागरिक मागील 20 वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या अभावी जिवन जगत असून त्यांच्या जीवनावश्यक व मूलभुत समस्या सोडवा असे निवेदन भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात जिवती चे तहसीलदार यांना देण्यात आले.
जिवती तालुक्यातील सर्व शेतक-यांना सरसकट जमीनीचे पटटे देण्यात यावे, शेतजमीनीचे फेरफार त्वरीत काण्यात यावे, जिवती नगरपंचायत क्षेत्रात घरकुल योजना लागु करण्यात यावे, तालुक्यातील सिंचनाचे प्रकल्प सुरू कण्यात यावे, युवकांना रोजगार उपलब्ध करावे, शहरात बसस्थानक निर्माण करावे, जात प्रमाणपत्र देण्याकरीता 50 वर्षाची अट शिथील करावी, युवकांना पोलीस भरती प्रशिक्षाणासाठी मुलभुत सुविधा करण्यात यावी, विध्यार्थासाठी वस्तीगृह निमार्ण करावे, शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी निधी तात्काळ जमा करावे, जिवती नगर पंचायत येथील पंचशिल नगर, शांतीनगर व इतर वार्ड मध्ये पाण्याचे नळ योजना तात्काळ लागू करावी, जिवती येथे न्यायालय सुरू करण्यात यावे, तालुक्यातील वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रदद करण्यात यावी, जिवती येथे भारत सरकार पुरस्कृत बँकेची शाखा (SBI) उघडण्यात यावे, तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचा-यांची उपस्थीती नोंद करण्याकरीता तहसील कार्यालय येथे बॉयमोंट्रीक व कॉमेरा युक्त मशिन बसविण्यात यावी, तालुक्यातील लांबोरी येथील जिओ. (JIO) चे टॉवर तात्काळ चालु करण्यात यावे अश्या जिवती तालुक्यातील नागरिकांच्या महत्वाच्या गरजांची मागणी फुसे यांनी केली.
जिवती तालुक्याची स्थापना सन 2002 मध्ये झाली त्यावर्षापासुन आज पर्यंत जिवती तालुक्यावर सातत्याने अन्याय करण्यात आलेला आहे. संपुर्ण तालुका वनक्षेत्र झोन घोषीत केल्यामुळे तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला आनेक समस्यांना तोड दयावे लागत आहे, तालुक्यात मुलभुत सुविधाचा अभाव असुन येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिवती तालुक्यांचे मानव विकास सूचकांक महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी आहे.
शेतकरी, शेतमंजुर जमीनीचे पटटे नसल्यामुळे सर्व शेतकरी शासकीय योजने पासुन वंचित आहे. येथील युवकांना पोलीस भरती प्रशिक्षण रोजगार मिळवण्यासाठी कुठलिही मुलभुत सुविधा नाही. विध्यार्थानासाठी वसतिगृह, अभ्यासीका, मोबाईल टॉवर सेवा नसल्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात आलेले आहे, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार या सर्व मुलभुत सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील पुरूष, महीला युवक, युवती, विध्यार्थी त्रस्त असुन त्यांच्यात आक्रोश निर्माण होत आहे. वेळेत या समस्यांचे निवारण न केल्यास नागरीकांचा रोष अनीयंत्रीत होवुन शासन प्रसानावर व्यक्त होवू शेकतो, येणा-या काळात या रोषामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
करिता वरील सर्व विषयान्वर सकारात्मक व समाधानकारक लेखी उत्तर येत्या 7 दिवसांत देण्यात यावे अन्यथा भारत राष्ट्र समीती व जिवती तालुक्यातील सर्व नागरीक मिळुन रस्त्यावर उत्तरूण तिव्र आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलन दरम्यान कायदा व सुव्यव्यवस्था बिगघडल्यास शासन, प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार असा ईशारा ही यावेळी देण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

