🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन समुद्रपुर:- पोलीस स्टेशन समुद्रपूर चे ठाणेदार एस.बी. शेगांवकर यांचे मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीत विविध कार्यवाहीमध्ये अवैधरित्या देशी विदेशी व मोहा दारूची वाहतुक करणाऱ्या 07 गुन्हेगारांवर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली असून, दोन मोटर सायकल व मोपेडसह एकुण किं. 2,80,400 रू. चा माल जप्त करण्यात आला.
यात पहिल्या कार्यवाहीमध्ये आरोपी 1) तेजस राजू काबळे, 2) चेतन महेश वाटमोडे 3) एक विधी संघर्षीत बालक सर्व रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट यांचे ताब्यातून एक बजाज 220
पल्सर मोटर सायकल क. MH-40/BD-5513 किं. 1,00,000 रू. व 08 प्लास्टीक ब्लॅडरमध्ये प्रती ब्लॅडर अंदाजे 15 ली प्रमाणे 120 ली गावठी मोहा दारू प्रती लिटर 100 रू. प्रमाणे किं. 12,000रू. व ब्लॅडर कि. 1,600 रू. असा जु. किं. 1,13,600 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कार्यवाहीमध्ये आरोपी नामे 1) राजू नरेश मेंढे, रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट 2 )विजय लक्ष्मण सुपारे, रा. नन्नाशहा वार्ड, हिंगणघाट यांचे ताब्यातून एक काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्रो मोटर सायकल क. MH-32/AB-3833 किं. 50,000 रू. व 04 प्लास्टीक ब्लॅडरमध्ये प्रती ब्लॅडर अंदाजे 15 ली प्रमाणे 60 ली गावठी मोहा दारू प्रती लिटर 100 रू. प्रमाणे किं. 6,000 रू. व ब्लॅडर कि. 800 रू. असा जु.किं. 56,800 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसऱ्या कार्यवाहीमध्ये आरोपी नामे 1) रोशन रामदास कोटंबकर, 2) अनिकेत दिलीप भोगे, दोन्ही रा. वार्ड क्र 02 बेला, जि. नागपूर यांचे ताब्यातून एक मॅगनम कंपनीची विना क्रमांकाची मोपेड किं. 80,000 रू., एका खरर्याचे खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या ओ.सी. ब्लू. कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 48 सिलबंद शिशा, किं 14,400 रू. एका खरर्याचे खोक्यात विदेशी
दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग. कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 24 सिलबंद शिशा, किं 8,400 रू.व एका खरयचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या कोकण देशी संत्रा 999 कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 48 सिलबंद शिशा, किं 7,200 रू. असा जु.किं. 1,10,000 रू चा मुद्देमाल, अशा प्रकारे तिन वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये 07 आरोपीतांवर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली असून, जु.किं. 2,80,400 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. एस. बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो. ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे, म.पो.ना. ज्योती राउत (म.पो.म.कें.जाम) यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

