माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या’ यांच्या प्रमुख उपस्थिती ‘अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याचा हजारोच्या संख्येने तहसील कार्यालय धडक.
राष्ट्रवादीच्या मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी व ओबीसी बांधवांचा सहभाग, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रतिपादन.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पेटत असताना, शासनाकडून आरक्षणाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यादरम्यान ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे समुद्रपुरात विदर्भातील पहिला ओबीसींच्या संरक्षणार्थ एल्गार मोर्चा काढण्यात आला. या एल्गार मोर्चाचे नेतृत्व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले तर आयोजन राष्ट्रवादीचे समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग यांनी केले. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मोर्चाची बांधणी करत समुद्रपुरात एल्गार केला.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे मात्र हे आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये असे प्रतिपादन यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी देखिल मागणी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी प्रवेश केला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश धोटे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर माजी सरपंच विनोदराव कुटे यांनी देखील आपल्या काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. समुद्रपूर व सिंधी रेल्वे भागातील अनेक गावातील व्यक्तींनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचता कामा नये असे यावेळी अतुल वांदिले यांनी ठासून सांगितले. यावर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे शेतमालांचे अतिशय नुकसान झाले आहे कुठे पाऊस तर कुठे दुष्काळ या स्थितीत शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढले दिवसेंदिवस वाढत्या लागवड खर्च महागडी बियाणे यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे त्यातच सन २०२३ ते २०२४ चे शासनाने हमीभाव जाहीर केले मागील वर्षाच्या तुलनेत अत्यल्प आहे तरी या निवेदनाद्वारे आम्ही खालील मागण्या करीत आहोत.
सन २०२३ ते २०२४ चे शेतमालाचे शासनाने जाहीर केलेले हमीभाव मागील वर्षाच्या तुलनेमध्ये अत्यल्प आहे सोयाबीनचे भाव 4300 ते 4600 असून कापसाचे भाव 6620 ते 7020 आहे तरी शेतमालाच्या भावामध्ये वाढ करण्यात यावी.
रानटी जनावरापासून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी. तसेच ताडोबा जंगलाला लागून असल्याने भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त अधिकाऱ्यांनी तात्काळ करावा नंबर तीन रानटी प्राण्यांचा घात हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवित हानीची जबाबदारी शासनाने निश्चित करावी.
पुरपीडित असलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे 1 काही प्रमाणात करण्यात आले व काही अजिबात करण्यात आले नाही ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्या शेतकरी बांधवांना शासनाची अजूनही मदत मिळाली नाही ती मदत त्वरित मिळावी व उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे.
समुद्रपूर तालुक्यातील कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा बंद राहते व रात्रीला सुरू असते त्यामुळे शेतकऱ्याला शेतमालाला पाणी देता येत नाही करिता लोड शेडिंग बंद करण्यात यावे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा पाणी पुरवठा सुरळीत करता येईल.
तसेच समुद्रपूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्या खालील प्रमाणे असून त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे हे गरजेचे आहे.
समुद्रपूर तालुक्यात असलेले १५० पेक्षा जास्त खेडे गावे आहेत समुद्रपूरला लागूनच जाम चौरस्ता आहे व येथूनच नॅशनल हायवे क्रमांक ४४ गेला असून या हायवेने जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते हा नॅशनल हायवे अपघात ग्रस्त बनलेला असून या हायवेवर दर महिन्याला आठ ते दहा अपघात निश्चित होत असतात दवाखाना जवळ नसल्याने अनेक अपघातग्रस्त लोकांचा मृत्यू झालेला आहे म्हणून समुद्रपूर येथे ग्रामीण रुग्णालयाला शंभर बेडसह उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा व तसेच आयसीयू ट्रॉमा केअर सेंटर देण्यात यावे.
जाम चौरस्ता येथून नॅशनल हायवे नागपूर ते हैदराबाद तसेच चंद्रपूर ते नागपूर गेला असून अनेक शहराला/गावाला जाण्याचा मार्ग हा जाम चौरस्ता सेंटर पॉईंट बनला आहे त्यामुळे तिथे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे जाम चौरस्ता येथे उडानपुराची निर्मिती करण्यात यावी व यावर शासनाने प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, युवा नेते समीर देशमुख तालुका अध्यक्ष महेश झोटींग, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष, प्रलय तेलंग, गजानन शेंडे, अशोक वांदिले, दिनकरराव घोरपडे, अशोकजी डगवार, बबनरावजी हिंगणीकर, प्राचार्य अशोक कलोडे, अशोक कलोडे, गणेश वैरागडे ,ज्योती देशमुख जिल्हाध्यक्ष महिला, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, युवक कार्याध्यक्ष सचिन पारसडे ,शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, रवींद्र झाडे, सोनू मेश्राम, संतोष तिमांडे, विनोद कुटे, गुरुदयालसिंग, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, दशरथ ठाकरे, सुरेश भगत, राष्ट्रपाल कांबळे, संदीप झाडे, अनिल देशमुख, अनिल आडकीने, जावेद मिर्झा, सुभाष चौधरी, गोकुळ टिपले, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

