उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हयातील अंतरवाली सराटे गावात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू होते त्या ठिकाणी निष्पाप लोकांवर शेकडो पोलीसांनी निर्दयी लाठी हल्ला केला त्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी वाळवा तालुका येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने निषेध नोंदवुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
पोलिसांनी अचानक करण्यात आलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात अनेक वृद्ध तसेच महीला व लहान मुले गंभीर जखमी झाले या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे या हल्ल्याची जबाबदारी स्विकारुन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच आंदोलकांवरील सर्व गुन्हे त्वरित मागे घ्यावेत या मागणी साठी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने प्रशासनाचा निषेध नोंदविला तसेच वाळवा इस्लामपूर येथे मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई, महाराष्ट्र सचिव राधेशाम खरात, जालना जिल्हा अध्यक्ष प्रमोद खरात, जाफ्राबाद तालुका अध्यक्ष खलील नुर अहेमद शहा, तालुका प्रसिध्दी प्रमुख सुनील शेळके आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

