मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिगंणघाट:- स्थानिक मातोश्री महाविद्यालयात इनरव्हिल क्लबचे वतीने आर्थीक व्यवस्थापन यावर एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.यात जवळपास तिनशेच्या वर विद्यार्थीनींचा सहभाग होता.
सध्या समाजात चंगळवाद सुरु झाला असुन त्यामुळे गरजा एव्हड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असुन त्याची मोजदाद करणे ही कठीणआहे.हेच नव्हे तर त्यात रोज भर पडत आहे. पण त्या प्रमाणात उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत आहे. त्यामुळे संसारात जर योग्य आर्थीक नियोजन नसेल तर सतत ओढाताण सुरु असते व त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व मनस्ताप सहन करावा लागतो त्याचाच परीणाम मग आपल्या स्वास्थावर होऊन कुटुबांचे सारे गणीतच चुकत जाते, याच सर्व गोष्टींचा विचार करुन क्लबने लवकरच आपल्या संसारात पदार्पण करणार्या युवतींकरीता या सेमिनारचे आयोजन केले. यात आपल्या गरजा व उत्पन्नाचे स्त्रोत यांचा मेळ कसा बसवायचे यावर क्लब अध्यक्षा सी.ए.पुजा हुरकट यांनी अत्यंत सहजता पुर्ण वाणीने मुलिंना मार्गदर्शन करुन त्यांना जागरुक केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

