पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका कुटुंबाची फसवणूक करून त्याच्या कडून 15 कोटीची खंडणी उखळल्याची घटना समोर आली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे.
राहुल प्रेमप्रकाश गोयल, वय ३८ वर्षे, पत्ता १०७ एबीसी सिटी टॉवर, ढोलेपाटील रोड पुणे यांची आरोपी कुणाल शंकर मासाळ, अनिता शंकर मासाळ, चैताली शंकर मासाळ, तेजस शंकर मासाळ सर्व रा. मौजे पिसोळी, ता. हवेली, जि. पुणे यांनी फसवून करून 15 कोटीची खंडणी घेतली होती. यासर्वा विरोधात राहुल प्रेमप्रकाश गोयल यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायालय पुणे यांच्या न्यातलयात दाद मागण्यासाठी प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश देत आरोपी कुणाल शंकर मासाळ, अनिता शंकर मासाळ, चैताली शंकर मासाळ, तेजस शंकर मासाळ यांचावर गुन्हा दाखल करण्याच्या आदेश कोंढवा पोलीसांना दिला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायालय पुणे यांचा आदेश प्राप्त होताच कोंढवा पोलीसांनी आरोपी मासाळ कुटुंबातील चार लोकांवर 930 / 2023 भादवि कलम 420, 465, 468, 471, 388, 34 प्रमाणे फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल प्रेमप्रकाश गोयल यांनी पोलिसाना दिल्यात तक्रारीत, दि. 29 डिसेंबर 2813 रोजी पासुन ते जून 2023 दरम्यान स.नं. 14/3 मौजे पिसोळी ता. हवेली जि. पुणे येथे स.नं. 14/3 मौजे पिसोळी ता. हवेली जि. पुणे येथील कुणाल शंकर मासाळ, अनिता शंकर मासाळ, चैताली शंकरमासाळ, तेजस शंकर मासाळ व मौजे पिसोळी येथील इतर मासाळ कुटूंबीय यांनी त्यांचे मालकीची 01 हेक्टर 35 आर जमीन दि.29 डिसेंबर 2013 रोजी हवेली क्र. 22 पुणे येथे दस्त क्र. 6932/ 2813अन्वयेविकासनाला देऊन त्याप्रमाणे १९ टक्के रेव्हेन्यू शेअरींग द्यायचे ठरले असताना कुणाल शंकरमासाळ, अनिता शंकर मासाळ, चैताली शंकर मासाळ, तेजस शंकर मासाळ यांनी त्यामध्येबदल करून त्यांना 19 टक्के रेव्हेन्यू शेअरींग नको असुन त्यांना 38 टक्के सेलेबल बांधकाम क्षेत्र द्या असे सांगुन तक्रारकरते राहुल प्रेमप्रकाश गोयल यांच्या हिस्स्याची हेक्टर 16.90 आर क्षेत्रावर 8957 चौ. फुट बांधकामकरण्यासाठी 4 कोटी रुपये खर्च करायला भाग पाडुन ठरलेप्रमाणे चुकदुरूस्ती दस्त करून दिलानाही. तसेच तक्रारकर्ते राहुल प्रेमप्रकाश गोयल त्यांच्या हिस्स्याचे तयार केलेले बांधकाम ताब्यात न देता त्यांची फसवणुक केली आहे.
त्यानंतर कुणाल मासाळ यांनी व त्यांचे कुटूबींय यांनी त्यांना ३८ टक्के रेव्हेन्यू शेअरींग किंवा ३८ टक्के सेलेबल बांधकाम क्षेत्र नको असे म्हणुन 15 कोटी रुपये बेकायदेशिररित्या खंडणी स्वरूपात मागितली ते गोयल यांनी न दिल्याने मासाळ कुटुंबीयांनी तक्रारकत्या खंडणीची रक्कम वसुल करण्याचे उद्देशाने एरिया स्टेटमेंट अफ्टर युडीसीपीआर २०२० नियमावली चा खोटा दस्त बनवून व तो खरा असल्याचे भासवून आम्हास खोटया गुन्हयात अडकवू अशी धमकी देऊन आमचे विरुध्द मा. न्यायालयात खोटी तक्रार| दाखल करून आमचेवर दबाव निर्माण करून आमचे कडून रू.१५,००,००,०००/- इतक्या रक्कमेची खंडणी मागितली आहे. म्हणुन माझी श्री. कुणाल शंकर मासाळ, श्रीमती अनिता शंकर मासाळ, चैताली शंकर मासाळ, तेजस शंकर मासाळ यांचे विरुध्द कायदेशिर मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, लष्करन्यायालय पुणे दिल्याने व त्यावरून मा. न्यायालयाचे आदेशाप्रमाणे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेलाआहे.
दाखल करणारे अधिकारी :- पुजा पाटील पोलीस उप निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर तपासी अधिकारी..

