पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत श्रावण महिना, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, दहिहंडी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद. अनंत चतुर्थी, घटस्थापना, दसरा व दिवाळी असे विविध धमांचे धार्मीक सणाच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हददीत कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने शहरातून पोलिसांचा नुकताच दंगा काबु योजना व रूट रुट मार्च काढण्यात आला.
सण, उत्सवांच्या काळात शहरात राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदार्य वृद्धींगत व्हावा यासाठी सर्व पोलीस स्टाफसह सदर भागात संदिप भोसले पोलीस निरीक्षक गुन्हे १ व स्टाफ सह पायी गस्त करून चौकी व तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना वारंवार पेट्रोलींग करणे बाबत सुचना देवून सदर दंगा काबु योजना १८.५८ वा संपविला.
तसेच आगामी गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्थी, घटस्थापना, दसरा व दिवाळी आगामी सणाच्या सण उत्सवानिमित्त त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यासह आशिर्वाद चौक येथून १९.०५ वा सुरु करुन सत्यानंद हॉस्पिटल बादशह नगर सोसायटी कोणार्कपुरम सोसायटी भैरवनाथ मंदिर – भिमनगर नरवीर तानाजी मालुसरे चौक ज्योती हॉटेल चौक आयसीआयसी आय बँक येथून डावीकडुन पुन्हा नरवीर तानाजी मालुसरे चौक संत गाडगेबाबा शाळा भैरवनाथ मंदिर आर्शिवाद चौक- अशोका म्युज सोसायटी कोंढवा पोलीस स्टेशन येथे समाप्त असा १९.३० वा. पर्यंत रूट मार्च घेण्यात आला.

जातीय दंगा काबु योजना तालमीचे वेळी आम्ही स्वतःसंदिप भोसले, पोलीस निरीक्षक गुन्हे (१), सहा. पो. निरीक्षक व पो. उपनिरीक्षक ०४ आर.सी.पी. ५. तसेच ३० पोलीस अंमलदार यांना जातीय दंगा काबु योजना व रूट मार्च झाले नंतर अधिकारी व अमलदार यांना कोंढवा पोलिस स्टेशन येथे आणून ब्रिफिंग करून बंदोबस्त क्लोज करण्यात आला. संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन यांनी दिली.

