पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दि. १३/०९/२०२३ रोजी फिर्यादी यांची एम्.एच. १२ एफ. सी.. १६५८ बजाज कंपनीची ऑटोरिक्षा चोरी झाली होती व त्यांच्या तक्रारीवरून सदरबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुरनं २०५/२०२३ भादविक. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी करीत होते. सदर गुन्हयातील चोरी झालेली ऑटोरिक्षाचा पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली. गुन्हा घडल्याच्या ठिकाणापासून तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेरे पो.अ. हेमंत पेरणे, शरद घोरपडे व रोहीदास वाघेरे यांनी तपासले. हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पो. अं. हेमंत पेरणे व रहीम शेख यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, चोरीला गेलेली रिक्षा एम्. एच्. १२ एफ. सी. १६५८ ही बारणे रोड मंगळवार पेठ, पुणे या ठिकाणी थांबलेली असून त्यात दोन इसम बसलेले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व स्टाफ मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी गेले असता. सदरची रिक्षा व दोन इसम दिसून आले. पोलीसांना पाहुन दोन्ही इसम रिक्षा सोडून पळुन जावू लागले. त्यांचा पाठलाग करून त्यांना स्टाफच्या मदतीने पकडले. त्यांचे नाव व पत्ता विचारता असता. त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १) आलीम अल्ताफ पालकर वय २६ वर्षे, रा. आलीम टॉवर जवळ घर नं. २. गल्ली नं. ३ कोंढवा पुणे २) अक्तर हसन शेख वय २४ वर्ष, रा. ग्रीन पार्क, गल्ली नं २ घर क्र. ६०, कोंढवा, पुणे असे सांगितले, तसेच त्याचेजवळ असलेल्या एम्.एच. १२ एफ. सी. १६५८ बजाज कंपनीची ऑटोरिक्षाच्या कागदपत्रांची विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना सोबतचे पोलीस स्टाफच्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता, दोघांनी सदरची एम.एच्. १२ एफ. सी. १६५८ ही ऑटोरिक्षा ११२३ न्यु नाना पेठ पुणे येथून चोरल्याची कबूली दिली. अधिक तपासात अजून एम. एच. १२ एफ. सी. ०३९८ ऑटोरिक्षा व एम्. एच्. १२ जे. ई २२०० दुचाकी अशी चाहने समर्थ पोलीस स्टेशन हदीतून चोरल्याचे सांगितले, समर्थ पोलीस स्टेशन येथील अभिलेख तपासले असता गु.र.नं. २०७/२०२३ व २०८/२०२३ दाखल आहेत. सदरचे तिन्ही वाहने पंचनाम्याने ताब्यात घेवून सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींवर यापूर्वी चोरीचे व घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. प्रविण पाटील अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. श्री संदीप गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 19 पुणे शहर, मा. श्री. अशोक घुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे श्री. सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ थोरवे, पोअं, हेमंत पेरणे, शरद घोरपडे पोना रहीम शेख, पोहवा. रोहीदास वाघेरे, प्रमोद जगताप, पोहवा, गणेश वायकर, शहाजी केकान, सपोफी, दत्तात्रय भोसले, पोज, अमोल शिंदे. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी केली आहे…

